मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या प्रारुप मतदारयादीत मोठा घोळ असल्याचं उघड झालंय... मुंबईत 11 लाख मतदार दुबार असल्याची धक्कादायक बाब निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रारुप मतदारयादीतून समोर आलीय... विशेष म्हणजे एका मतदाराचं नाव तर तब्बल १०३ वेळा नोंदवण्यात आलंय....त्यामुळे याद्यांचा घोळ किती मोठा आहे हे यातून दिसतंय...
मुंबईत 11 लाख दुबार मतदार - हेडर
एकूण मतदार 1,03,44,315
दुबार मतदारांची संख्या - 6,68,505
दोनपेक्षा अधिक वेळा नावं - 4, 33, 000
एकाच व्यक्तीचं 103 वेळा नाव
एकूण दुबार नावं - 11,01,505
यातल्या सर्वाधिक दुबार मतदारांची नावं आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील जी साऊथ वॉर्डमध्ये आढळून आलीयत... त्यापाठोपाठ कुर्ला, भेंडीबाजार, कुलाबा भागात दुबार मतदार सापडलेत..
ठाकरेंच्या वरळीत सर्वाधिक दुबार मतदार - हेडर
वार्ड माजी नगरसेवक दुबार मतदार
199 किशोरी पेडणेकर (ठाकरेसेना) 8,207
194 समाधान सरवणकर (शिंदेसेना) 7584
196 आशिष चेंबुरकर (ठाकरेसेना) 7091
198 स्नेहल आंबेकर (ठाकरेसेना) 7295
आता निवडणूक आयोगानेच जारी केलेल्या प्रारुप यादीत 11 लाख दुबार मतदार आढळून आल्यानं ठाकरेसेनेनं निवडणूक आयोगाला घेरलंय..एवढंच नाही तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचंही नाव दुबार नोंदवण्यात आलंय. यावर आम्हाला मतदानापासून रोखण्यासाठी दुबार नाव टाकल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केलाय...
आधी राहुल गांधींनी व्होटचोरीचा आरोप करत दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आणला.. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील बोगस मतदारांचा पर्दाफाश केला.. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढून आयोगाची पोलखोल केली.. मात्र निवडणुकीत ही नावं वगळण्याऐवजी दुबार नावं असलेल्या मतदाराकडून एकाच ठिकाणी मतदान करणार, असं हमीपत्र भरुन घेतलं जाणार असल्याची भूमिका पालिकेनं घेतलीय. त्यामुळे ही नावं वगळली तशीच राहणार असून बोगस मतदानाची शक्यता बळावलीय. आता विरोधक यावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.