ललित प्रभाकर लवकरच 'आरपार' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आरपार'नंतर ललित हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
'आरपार' 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
मराठी अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar ) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'आरपार'मुळे (Aarpar ) चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे झळकली आहे. 'आरपार'ही एक सुंदर प्रेमकथा आहे. अशात आता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री होणार आहे.
ललित प्रभाकरला हिंदी चित्रपटाची लॉटरी लागली आहे. ललित प्रभाकरच्या नवीन हिंदी चित्रपटाचे नाव 'वन टू चा चा चा' असे (one two cha cha cha) आहे. याआधी देखील ललित इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' चित्रपटात झळकला होता. 'वन टू चा चा चा' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक राज आणि रजनीश ठाकूर यांनी केली असून साजन गुप्ता, विजय लालवानी आणि नताशा सेठी यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट फॅमिली ड्रामा आहे.
ललित प्रभाकरचा मराठी चित्रपट 'आरपार' 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. तर 'वन टू चा चा चा' हा चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वन टू चा चा चा' चित्रपटात बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत. तसेच त्यानंतर ललित प्रभाकर 'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटातून झळकणार आहे. हा चित्रपट 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
ललित प्रभाकरचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या अभिनयाचे आणि लूकचे लाखो चाहते दिवाने आहेत. 'आरपार' चित्रपटात ललित रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. चाहते त्यांच्या आगमी चित्रपटांसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.