Lagnanantar Hoilach Prem saam tv
मनोरंजन बातम्या

Lagnanantar Hoilach Prem : गुलाबी साडी अन् मोकळे केस; काव्याचा लूक बदलला, पार्थ पाहतच राहिला-VIDEO

Lagnanantar Hoilach Prem-Kavya Parth Love Story : 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काव्याने पार्थसाठी आपला लूक बदलला आहे. ती सुंदर साडी नेसून पार्थ समोर येते.

Shreya Maskar

'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये जीवा-काव्या हे नंदिनी-पार्थचे प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

रम्या काव्या आणि पार्थच्या नात्याच्या मध्ये येत आहे.

जीवा नंदिनीला मनवण्यासाठी तिच्या घराबाहेर राहत आहे.

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत जीवा आणि काव्याचे अफेअर सर्वांना समजते. त्यानंतर चौघाचे आयुष्य बदलते. नंदिनी जीवाकडे आणि पार्थ काव्याकडे घटस्फोट मागतो. मात्र जीवा आणि काव्या आपापले प्रेम मिळवण्याचा निश्चय करतात. जीवा नंदिनीच्या घरी राहायला जातो. तर काव्या पार्थच्या घरी येते. आता या चौघांचे नाते कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशात मालिकेच्या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवीन प्रोमो

'लग्नानंतर होईलच प्रेम'च्या नवीन प्रोमोमध्ये काव्या साडी नेसून खाली येते आणि दुसऱ्या बाजूने पार्थ फाईल बघत येत असतो. तेव्हा दोघांची टक्कर होते. काव्या पडणार असते मात्र पार्थ तिला सावरतो. काव्याला साडीत पाहून पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. फाईलमधील पाने सगळीकडे पसरतात. त्याच पानावरून रम्याचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. तेव्हा रम्या पार्थकडे उठण्यासाठी हात मागते. तेव्हा काव्या पुढे येत रम्याला हात देते आणि म्हणते की, "रम्या यापुढे कधीही पडलीस तर मला हाक मार. मी तुला पुरून उरेन..."

नवीन प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "काव्या पडणार रम्यावर भारी…", अशी कॅप्शन दिली आहे. या प्रोमोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच बदलेला लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा खास एपिसोड रविवार 11 जानेवारी संध्याकाळ 7:00 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते खूपच उत्सुक आहेत.

काव्याचा बदललेला लूक

'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये सुरूवातीपासून काव्या ड्रेसमध्ये दिसली आहे. फक्त सणासुदीला ती साडी नेसलेली पाहायला मिळाली. मात्र आता लाडक्या बोक्याला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी काव्याने आपला लूक बदलला आहे. काव्याने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. मोकळे केस, मिनिमल मेकअप, गळ्यात मोठे मंगळसूत्र घालून तिने लूक पूर्ण केला आहे. काव्याचा हा लूक पार्थला खूपच आवडलेला दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : भाजीसाठी लागणारे वाटण जास्त काळ ताजे कसे ठेवावे? जाणून घ्या टिप्स

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT