'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.
काव्या-जीवाचे लग्नाआधीचे अफेअर नंदिनी-पार्थला समजते.
पार्थचा प्रेमावरून विश्वास उडतो. तर नंदिनी आयुष्याचा मोठा निर्णय घेते.
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत सध्या धक्कादायक वळण आले आहे. देशमुख कुटुंबाला, नंदिनी, पार्थला जीवा आणि काव्याच्या लग्नाआधीच्या नात्याबद्दल सर्व समजले आहे. जीवा-काव्याच्या अफेरचा मोठा खुलासा झाला आहे. ज्यामुळे एक क्षणात जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्या यांचे आयुष्य बदलले आहे.
रम्या आणि वसू आत्याचा डाव जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्या यांच्या आयुष्यावर बेतला आहे. रम्या आणि वसू आत्याने व्हिडीओमध्ये जीवा-काव्याचे जुने फोटो दाखवत त्यांच्या नात्याचा खुलासा केला. जीवा-काव्याने लपवलेले सत्य शेवटी घरासमोर येते आणि नंदिनी-पार्थच्या पायाखालची जमीन सरकते. पार्थचा प्रेमावरचा विश्वास उडतो. तर नंदिनी चक्कर येऊन खाली पडते. नंदिनीला लग्नानंतर घडलेले सर्व प्रसंग आठवतात. काव्याच्या चिडण्याचा आणि रागवण्याचा खरा अर्थ समजतो.
काव्या-जीवाने त्यांचे नाते लपवल्यामुळे नंदिनी-पार्थ खूप दुखावले जातात. शेवटी नंदिनी हात जोडून काव्याची माफी मागते. कारण दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये नंदिनी-पार्थ आले असतात. त्यानंतर नंदिनी काव्या-जीवाला एकत्र येण्यास सांगते. जीवाचा हातात काव्याचा हातात देते. जे ऐकून घरातील सर्व सदस्यांना धक्का बसतो. पार्थला काव्या सांभाळायला जाते. तेव्हा तो तिचा हात झटकतो आणि आईचा आधार घेतो.
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 7.00 वाजता पाहायला मिळते. आता जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? की नंदिनी-पार्थ आपल्या नात्याला दुसरा संधी देणार? की जीवा-काव्या लग्न करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येणार एपिसोड खूपच मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.