Lagnanantar Hoilach Prem: विक्रम-मानिनीसमोर येणार का जीवा-काव्याचं सत्य? 'लग्नानंतर होईलच प्रेम'मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

Lagnanantar Hoilach Prem Latest Promo: लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत सुनीताच्या हातात आला जीव आणि काव्याचा व्हिडिओ लागणार. देशमुख घराण्यात उघड होणार मोठं रहस्य, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला.
Lagnanantar Hoilach Prem Latest Promo
Lagnanantar Hoilach Prem Latest PromoSaam tv
Published On

Lagnanantar Hoilach Prem Latest Promo: स्टार प्रवाहवरील चर्चेत असलेल्या मालिकेत सध्या मोठा खुलासा होणार आहे. मालिकेतील सुनीताला जीवा व काव्याचा एक पुरावा सापडतो. ती कॅफेमध्ये झालेला त्यांचा व्हिडिओ फुटेज ‘पेनड्राइव्ह’मध्येही कॉपी करते.
हा पुरावा सुनीता थेट देशमुखांच्या घरात मानिनी व विक्रमसमोर मांडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लवकरत कथानकात आश्चर्यकारक वळण येण्याची शक्यता वाढली आहे.

मालिकेतील पार्श्वभूमी अशी आहे की, दिवाळीच्या तयारीच्या दरम्यान देशमुख घरात आनंदाचं वातावरण आहे. काव्या व विक्रम घर सजवतात, तर नंदिनी सासू मानिनीसोबत फराळ बनविते.
परंतु या आनंदाच्या पार्श्वभूमीवर आता एक सत्य बाहेर येणार आहे. काव्या आणि जीवाचा भूतकाळ सर्वांसमोर येणार आहे. सुनीता आपल्या हातातील पेनड्राइव्ह उघडते तेव्हा समोर येतात हे दोघांचे खळबळजनक चित्र.

Lagnanantar Hoilach Prem Latest Promo
Shilpa Shetty:शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल

सुनीता म्हणते, “या तूझ्या लक्ष्मीने काय दिवे लावलेत तेही बघ, या पेनड्राइव्हमध्ये काव्या आणि त्या मुलाचं व्हिडीओ आहे. आता तूच बघून ठरव…” असे सांगताना तिच्या आवाजात थरार जाणवतो. या प्रसंगानंतर मानिनी, विक्रम, काव्या व सुनीता हे तिघेही त्या लॅपटॉप व पेनड्राइव्हसमोर बसतात. भावनिक व संवेदनशील क्षण अंगवळणी घेतल्याचं दृश्य या सीनसाठी चित्रित केलं गेलं आहे.

Lagnanantar Hoilach Prem Latest Promo
Paresh Rawal: 'आम्ही सुपर सेन्सॉर बोर्ड नाही...'; परेश रावल यांच्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास हाय कोर्टचा नकार

आता प्रश्न असा उभा राहतो की दिलेल्या पुराव्यामुळे काव्या-जीवा यांचा भूतकाळ देशमुख घराण्यासमोर येईल का? आणि हे सारे केवळ मानिनी व विक्रमसमोरच सीमित राहील की संपूर्ण कुटुंबावर परिणाम करेल? हे आगामी भागात सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com