Marathi Serial: 'मी नाही राहू शकत पार्थशिवाय…'; काव्या देणार प्रेमाची कबुली, 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये रोमँटिक ट्विस्ट

Lagnanantar Hoilach Prem: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. ही मालिका आता एका नव्या आणि रोमँटिक टप्प्यावर पोहोचली आहे.
Lagnanantar Hoilach Prem
Lagnanantar Hoilach PremSaam tv
Published On

Lagnanantar Hoilach Prem: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. नात्यांतील गुंतागुंती, भावना आणि प्रेमाच्या संघर्षातून पुढे जाणारी ही कथा आता एका नव्या आणि रोमँटिक टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, कारण काव्याने अखेर पार्थसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

प्रोमोमध्ये काव्या तिच्या सासूला सांगताना दिसते “मी नाही राहू शकत पार्थशिवाय…” या संवादाने मालिकेचा सध्याचा ट्रॅक पूर्णपणे बदलून टाकला आहे. काव्या आणि पार्थ यांच्या नात्यात आतापर्यंत गैरसमज आणि ताण दिसत होता, पण आता तिच्या कबुलीने त्यांच्या नात्यात नवीन सुंदर वळण येणार आहे.

Lagnanantar Hoilach Prem
Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

सोशल मीडियावर या प्रोमोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया ओघाने येत आहेत. अनेकांनी “मानिनीला आता तरी अक्कल आली का?” अशा विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी तर हा क्षण मालिकेतील ‘सगळ्यात सुंदर सीन’ असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

यापूर्वी मालिकेत गुरुजींच्या भाकितानुसार पार्थच्या आयुष्यात धोका येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे काव्याची ही प्रेमकबुली त्या भाकिताशी काहीतरी संबंध ठेवते का, असा प्रश्नही प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे. आता पुढच्या भागात पार्थ या कबुलीला काय उत्तर देतो आणि या नव्या वळणानंतर मानिनीची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com