Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

मुहूर्त ठरला! 'Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2' प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज, वेळ अन् तारीख काय? पाहा VIDEO

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo : 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची रिलीज डेट समोर आली आहे.

Shreya Maskar

टिव्हीची लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2) आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. याचा भन्नाट प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani ) या मुख्य भूमिकेत होत्या. त्यांना या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी मालिकेत 'तुलसी विरानी' ही भूमिका साकारली होती. 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'च्या प्रोमोमध्ये स्मृती इराणी यांना पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक कुटुंब हॉटेलमध्ये 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेची चर्चा करताना दिसत आहे. त्यानंतर स्मृती इराणी यांची धमाकेदार एन्ट्री होते. त्या म्हणतात की, "मी पुन्हा आले आहे. प्रेक्षकांसोबत माझे 25 वर्षांपासून घट्ट नातं आहे."

रिलीज डेट काय?

'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी खूप आतुर असल्याचे दिसून येत आहे. मालिका 29 जुलै पासून रात्री 10:30 वाजता 'स्टार प्लस' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. तर जिओ हॉटस्टारवर देखील तुम्ही मालिका पाहू शकता.

'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेचा टीआरपी देखील कायम टॉपवर राहीला होता. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने 2008ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता 25 वर्षानंतर तुलसी प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT