सासू -सुनेचा खेळ पुन्हा रंगणार; Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, तुलसीच्या भूमिकेत कोण?

Ekta Kapoor: एकता कपूरची 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेचा सीझन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे अपडेट जाणून घेऊयात.
Ekta Kapoor
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2SAAM TV
Published On

टिव्हीची लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2) आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. या मालिकेने आधी देखील प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन केले आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. एका स्त्रीच्या आयुष्यात लग्न झाल्यावर कशी सुख , दुःख येतात. त्याच्या आयुष्यातील विविध वळणे या मालिकेतून दाखण्यात आली आहे. आता लवकरच या मालिकेचा सीझन 2 येणार आहे.

एकता कपूरने (Ekta Kapoor) एका मिडिया मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, एकता कपूरची 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरा सीझन 150 भागांचा असेल. याचे कारण एकता कपूरने सांगितले की, "'क्योंकि सास भी कभी बहू थी' संपताना 2000 एपिसोड पूर्ण होण्यासाठी 150 भाग शिल्लक होते. त्यामुळे आता ते 150 पूर्ण होणार आहेत. 2000 एपिसोड्सचा टप्पा गाठणे हा मालिकेचा हक्क आहे."

एकता कपूरने स्मृती इराणी (Smriti Irani) तुलसीच्या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळतील अशी हिंट देखील दिली आहे. ती म्हणाली की," या मालिकेत एक राजकारणी देखील असेल" मीडिया रिपोर्टनुसार, 'क्योंकि सास भी कभी बहू थी' सीझन दोन मध्ये 'मिहिर विरानी'च्या भूमिकेसाठी अमर उपाध्याय, हितेन तेजवानी आणि रोनित रॉय यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप एकता कपूरने याबाबत कोणताही खुलासा केला नाही आहे.

'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून स्मृती इराणी यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी तुलसी विरानी हे पात्र साकारले होते. या मालिकेचा टीआरपी देखील कायम टॉपवर राहीला होता. अजूनही मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही आहे.

Ekta Kapoor
Salim Akhtar Death : मनोरंजन सृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com