Ekta kapoor : घाबरून कधीच काम केलं नाही, मी हिंदू; एकता कपूर काय म्हणाली ?

Ekta kapoor on being hindu secular : द साबरमती रिपोर्टचा ट्रेलर प्रदर्क्षित करण्यात आला आहे. यावेळी एकता कपूरने आपण हिंदू असून कधी कोणाला घाबरुन काम केल नसल्याचं विधान केलं आहे.
ekta kapoor on being hindu secular
ekta kapooryandex
Published On

बॅालिवूडची टिव्ही क्वीन आणि निर्माती एकता कपूर आपल्या चित्रपटांसह निर्भीड वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॅान्च सोहळा पार पडला. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विक्रांत मासी आणि रिधी डोगरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. एकता कपूरने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. द साबरमती रिपोर्ट ट्रेलर लॅान्च दरम्यान एकता कपूर उपस्थित होती. योवेळी आपण हिंदू असून कोणाला घाबरत नसल्याचे तिने म्हटले आहे.

'द साबरमती रिपोर्ट' च्या ट्रेलर लॅान्च दरम्यान एकता कपूरला 'सर्टिफिकेशनसाठी चित्रपट सेंसर बोर्ड कडे पाठवला तेव्हा, भीती वाटली का' ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेल्या उत्तराची आता सर्वत्र चर्चा होतेय. ती म्हणाली, 'मला अजिबात भीती वाटली नाही, मी आयुष्यात कधीच घाबरुन काम केले नाही. मी हिंदू आहे. कारण हिंदू होण्याचा अर्थ धर्मनिरपेक्ष होणं आहे, मी कधीही कोणत्याही धर्माबद्द्ल टिप्पणी करणार नाही.'

ekta kapoor on being hindu secular
Bigg Boss 18: "सलमान खानशी पंगा घेतला तर...", हेमा असं काय म्हणाली, Video होतोय व्हायरल

विक्रांत मासीला जिवे मारण्याची धमकी

'द साबरमती रिपोर्ट' ट्रेलर लान्च दरम्यान विक्रांत मासीने खुलासा केला कि, चित्रपटामुळे त्याला जिवे मारण्याची धमक्या मिळत आहे. आम्ही कलाकार आहोत, आम्ही चित्रपटाच्या माध्यामातून गोष्टी सांगतो आणि हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या सर्व प्रकरणामध्ये आम्ही एक टीम म्हणून एकत्र काम करत आहोत आणि त्या व्यवस्थित रित्या हाताळण्याचं काम करत आहोत.

कधी रिलीज होणार द साबरमती रिपोर्ट ?

द साबरमती रिपोर्ट हा एक ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. २७ फेब्रुवारी २००२ साली गुजरात मध्ये गोधरा ट्रेन जळवण्यात आली होती . यामध्ये साबरमती एक्सप्रेस ट्रेनचा सुद्धा समावेश होता. बालाजी मोशन पिक्चर्स द्वारा प्रस्तुत आणि विकिर फिल्म्स प्रोडक्शन यांच्या बॅनरच्या अंर्तगत 'द साबरमती रिपोर्टची' निर्मिती करण्यात आली. यामध्ये विक्रांत मासी , राशी खन्ना आणि रिद्धि डोगरा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. १५ नोव्हेंबर २०२४ला हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Edited By: Priyanka Mundinkeri

ekta kapoor on being hindu secular
Deepika- Ranveer Daughter Dua: लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच स्पॉट झाले दीपिका अन् रणवीर; एअरपोर्टवरचा VIDEO व्हायरल

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com