मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिग्गज चित्रपट निर्माते सलीम अख्तर (Salim Akhtar) यांचे निधन झालं आहे. 8 एप्रिल रोजी सलीम अख्तर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सलीम अख्तर यांचे निधन झाले. सलीम अख्तर यांच्या निधनाने चाहत्यांन मोठा धक्का बसला आहे. सलीम अख्तर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, सलीम अख्तर यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सलीम अख्तर यांच्यावर अंत्यसंस्कार आज (बुधवार 9 एप्रिल) रोजी दुपारी 1.30 वाजता इर्ला मशिदीजवळील स्मशानभूमीत केले जातील. सलीम अख्तर यांच्या निधनाचे कारण अद्याप समजले नाही आहे.
सलीम अख्तर यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात फूल और अंगारे, कयामत, राजा की आएगी बारात, चाँद सा रोशन चेहरा, चोरों की बारात, बटवारा, लोहा या चित्रपटांचा समावेश आहे. त्याचे चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. सलीम अख्तर यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. यात धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा , मिथुन चक्रवर्ती, शांतीप्रिया, प्रेम चोप्रा अशा अनेक मंडळींचा समावेश आहे.
सलीम अख्तर यांनी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना लाँच केले. सलीम अख्तर यांनी 'राजा की आयेगी बारात' चित्रपटातून राणी मुखर्जीला लाँच केले. हा चित्रपट 1997 ला रिलीज झाला होता. तर 'चंदा सा रोशन चेहरा' चित्रपटातून तमन्ना भाटियाला लाँच केले. हा चित्रपट 2005 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांनी सलीम अख्तर यांच्या चित्रपटांना भरपूर प्रेम दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.