Dharmendra: धर्मेंद्र यांच्या डोळ्याला काय झाले? ८९ वर्षीय अभिनेते म्हणाले, अभी भी बहुत दम है...' VIDEO व्हायरल

Dharmendra Eye Operation: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मंगळवारी एका आय क्लिनिकच्या बाहेर दिसले. त्यांच्या एका डोळ्यावर पट्टी बांधलेली पाहून त्याचे चाहते घाबरले आहेत.
Dharmendra Eye Operation
Dharmendra Eye OperationSaam Tv
Published On

Dharmendra: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अलीकडेच मुंबईत वैद्यकीय प्रक्रियेनंतर डोळ्यावर पट्टी बांधून आले होते. 'शोले' आणि 'राखवाला' सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ८९ वर्षीय अभिनेते पापाराझींच्या प्रश्नाचे उत्तर देताना खूपच एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह असल्याचे दिसले. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या व्हिडिओत धर्मेंद्र यांनी दिलेल्या उत्तराने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडीओ पापाराझी विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला, अनेक दशकांपासून इंडस्ट्रीमध्ये असलेल्या या अभिनेत्याने माध्यमांशी बोलताना डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेतही खूपच उत्साहात संवाद साधला. व्हिडिओमध्ये, धर्मेंद्र यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ते ठीक असल्याचे सांगितले तसेच चाहत्यांनी जास्त चिंता करू नये असे आवाहन देखील केले.

Dharmendra Eye Operation
Banjara: सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला 'बंजारा'; १४,८०० फूट उंचीवर शूट करुन रचला नवा इतिहास

उजवा डोळा प्लास्टरने झाकलेला असताना, ते आत्मविश्वासाने म्हणाले, "अभी भी बहुत दम है, बोहूत जान रखता हूं... मेरे आंख में ग्राफ्ट हुआ है?" (मी अजूनही खूप मजबूत आहे... माझा डोळा ग्राफ्ट झाला आहे. तो आता निघून जाईन, ठीक आहे?). शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या उत्साह जराही कमी झालेला दिसला नाही.

Dharmendra Eye Operation
Sikandar shows Cancelled: सलमान खानला मोठा झटका; ईदच्या दिवशीच 'सिकंदर'चे शो रद्द

धर्मेंद्रच्या डोळ्याला काय झाले?

धर्मेंद्र म्हणाले की त्यांच्या डोळ्याला प्रत्यारोपण झाला आहे. डोळ्यांच्या कलमांना कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन किंवा केराटोप्लास्टी असेही म्हणतात. ही एक प्रकारची डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे यामध्ये कॉर्निया दुसऱ्या कॉर्नियाने बदलला जातो जेणेकरून एखाद्या व्यक्तीला त्याच्या डोळ्यांनी गोष्टी स्पष्टपणे पाहता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com