Sikandar shows Cancelled: सलमान खानला मोठा झटका; ईदच्या दिवशीच 'सिकंदर'चे शो रद्द

Sikandar Movie: सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. ईदच्या दिवशी या चित्रपटाने दोन दिवसात ५५ कोटी रुपयांची कमाई केली. परंतु या चित्रपटाचे अनेक शो रद्द देखील करावे लागले.
Sikandar shows Cancelled
Sikandar shows CancelledSaam Tv
Published On

Sikandar shows Cancelled: ईदच्या निमित्ताने रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाने रविवारी म्हणजे पहिल्या दिवशी 26 कोटी रुपयांची ओपनिंग केली. सोमवारी ईदच्या दिवशी चित्रपटाची कमाई वाढली कारण सुट्टी असल्यामुळे या चित्रपटाचे काही ठिकाणी शो हाऊसफुल्ल झाले. परंतु काही ठिकाणी प्रेक्षकांच्या अभावामुळे शो रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली.

काही चित्रपटगृहांमध्ये 'सिकंदर' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. परंतु काही ठिकाणी शो रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली. एका अहवालानुसार, मुंबईत चित्रपटाचे अनेक शो जास्त प्रमाणात लावण्यात आले यामध्ये, G7 मल्टिप्लेक्स सारख्या चित्रपटगृहांचा समावेश आहे. जिथे प्रेक्षकांच्या वाढत्या गर्दीमुळे अधिक शो लावण्यात आले. परंतु सुरत, इंदूर आणि इतर अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाला प्रेक्षक न मिळाल्यामुळे सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले.

Sikandar shows Cancelled
Priyanka chopra: 'देसी गर्ल'चे पिंक सिटी जयपूरमध्ये शाही स्वागत; सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना केले खूश

बॉलीवूड हंगामाने एका चित्रपट व्यापार विश्लेषकाशी याबद्दल संवाद साधला, त्यांच्या म्हणण्यानुसार, "मुंबईत शो रद्द झाल्याचे आम्हाला एकही उदाहरण आढळले नाही. असे शो होते जिथे प्रेक्षकांची संख्या कमी होती. पण, त्यामुळे शो रद्द करावा लागेल अशी परिस्थिती भासली नाही. त्यामुळे मुंबईतील सकाळी कोणतेच शो रद्द झाले नाहीत. परंतु, सुरत, अहमदाबाद, भोपाळ, इंदूर इत्यादी ठिकाणीही चित्रपट पाहण्यासाठी लोक फारच कमी होते, विशेषतः ईदचा सण असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Sikandar shows Cancelled
Salman Khan crazy Fan: 'सिकंदर'साठी फॅन्स क्रेझी; चाहत्याने मोफत वाटली १.७२ लाख रुपयांची तिकिटे, VIDEO व्हायरल

अहवालानुसार, सुरतमधील एका सिनेमागृहातील दोन रात्रीचे शो 'ऑल द बेस्ट पांड्या' आणि 'उम्बारो' या गुजराती चित्रपटांनी बदलण्यात आले आहेत. या दोन्ही गुजराती चित्रपटांना, विशेषतः उम्बारो हा चित्रपट नवव्या आठवड्यात असूनही, चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, मुंबईतील सिंगल स्क्रीनवर 'सिकंदर' चांगली कामगिरी करत आहे. ९९१ आसनी गेटी आणि ८१८ आसनी गॅलेक्सी या दोन सर्वात मोठ्या सिंगल स्क्रीनवर ईदचे शो हाऊसफुल झाले. १०५ आसनी गॉसिपमध्येही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण, दक्षिण मुंबईतील पीव्हीआर आयनॉक्स नरिमन पॉइंट आणि मेट्रो आयनॉक्स येथे 'सिकंदर'चे रात्रीचे शो रद्द करण्यात आले आणि त्याऐवजी जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' हा चित्रपट दाखवण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com