king Movie: शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये 'स्टार' अभिनेत्रीची एन्ट्री; बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडीचा सहाव्यांदा ऑन स्क्रिन रोमान्स

King Movie Update: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या चित्रपटात दीपिका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
King Movie Update
King Movie UpdateSaam Tv
Published On

King Movie Update: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या चित्रपटात दीपिका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खानच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या सुहाना खानच्या आईची भूमिका दीपिका पदुकोण साकारणार आहे.

'किंग' हा सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये शाहरुख खान एका खूणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असतील. चित्रपटाची कथा बदला घेण्यावर आधारित असून, शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्या पात्रांच्या प्रवासाभोवती फिरते.

King Movie Update
Sakman Khan: 'कबीर खान, अली अब्बास जफरसोबत काम कर...' सलमान खानला नाराज चाहत्यांचा सल्ला!

दीपिका पदुकोणची भूमिका जरी कॅमिओ पुरती मर्यादीत असली तरी ती कथानकातील इमोशनसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तिच्या पात्रामुळे चित्रपटाच्या मुख्य संघर्षाला दिशा मिळते. शाहरुख खान आणि सिध्दार्थ आनंद यांनी या विशेष भूमिकेसाठी दीपिकाला निवडण्याची इच्छा व्यक्त केली होती, आणि दीपिकानेही उत्साहाने ही भूमिका स्वीकारली.

King Movie Update
Sreeleela: अचानक गर्दीतून एक हात आला अन्...; दार्जिलिंगमध्ये शूटिंगदरम्यान श्रीलीलासोबत घडला धक्कादायक प्रकार

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची ही सहावी एकत्रित फिल्म आहे, 'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅपी न्यू इयर', 'पठाण' आणि 'जवान' नंतर. 'किंग' हा चित्रपट २०२६ च्या उत्तरार्धात प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com