Sakman Khan: 'कबीर खान, अली अब्बास जफरसोबत काम कर...' सलमान खानला नाराज चाहत्यांचा सल्ला!

Salman Khan Fans: सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाला वाईट प्रतिसाद मिळाल्यानंतर, अभिनेता त्याच्या चाहत्यांना भेटला आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला.
Salman Khan
Salman KhanSaam Tv
Published On

Salman Khan: बॉलीवूडचा दबंग सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. सिकंदर हा अभिनेत्याचा सर्वात वाईट चित्रपट आहे. या निमित्ताने सलमान खानने अलीकडेच त्याच्या काही चाहत्यांना भेटून त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसला.

माध्यमांनी चाहत्यांशी संवाद साधला यावेळी चाहत्यांनीही सिकंदर चित्रपटाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की त्याचे चित्रपट अपेक्षांनुसार चालला नाही. सलमान खानला त्याच्या चाहत्यांची आवड समजून घेऊन मग चित्रपट केला पाहिजे तसेच त्याने त्याच्या चित्रपटांच्या गोष्टीवर देखील काम केले पाहिजे. अशा प्रतिकिया चाहत्यांनी दिल्या.

Salman Khan
Indian Idol 15 winner: मानसी घोषने जिंकला 'इंडियन आयडल १५'चा किताब; रेकॉर्ड केलं पहिलं बॉलिवूड गाणं

चाहते पुढे म्हणाले, सलमान खानचे पूर्वीचे अनेक चित्रपट असे आहेत, ज्यामध्ये ऍक्शन आणि ड्रामाचे संपूर्ण मिश्रण असायचे पण त्याप्रत्येक चित्रपटात काही तरी गोष्ट असायची जी चाहत्यांना आवडायची पण सिकंदरमध्ये गोष्टच नाही फक्त ऍक्शन आहे. त्यामुळे चाहत्यांनी सलमान खानला कबीर खान, अली अब्बास जफर अशा दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा सल्ला देत नवीन गोष्टीवर लक्ष देण्यास सांगितले आहे.

Salman Khan
Face Tanning Homemade Remedy: उन्हाळ्यात चेहरा टॅन पडलाय? 'हा' घरगुती उपाय कराल तर आठवड्याभरातच उजळेल चेहरा

सलमान खानचा चित्रपट उत्तम अशी कामगिरी करू शकला नाही. 'सिकंदर' हा 'छावा'च्या तोडीस असेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण, हा चित्रपट तेवढा उत्तम नसल्याने बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपयश येत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदानादेखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com