Shruti Kadam
उन्हामुले जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा काली पडली असेल तर कच्च्या दुधाने चेहऱ्याची मालिश केल्याने रंग उजळतो. दुधात लॅक्टिक अॅसिड असते, जे मृत त्वचेच्या पेशी काढून त्वचेवर चमक आणण्यास प्रभावी ठरू शकते.
कच्च्या दुधाने नियमित मालिश केल्याने चेहरा निरोगी होतो आणि नैसर्गिकरित्या चमकू लागतो.
जर तुमची त्वचा कोरडी राहिली तर कच्चे दूध तिला खोलवर हायड्रेट करते. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि पोषणयुक्त दिसते.
एवढेच नाही तर दूध त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतो. जर टॅनिंग किंवा पिग्मेंटेशनची समस्या असेल तर दुधाने मसाज केल्याने त्वचेचा रंग हळूहळू एकसारखा होतो.
कच्च्या दुधात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवर असलेले बॅक्टेरिया नष्ट करण्यास प्रभावी असतात, त्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.
दुधात असलेले प्रथिने आणि जीवनसत्त्वे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात, त्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. म्हणून, तुम्ही बराच काळ तरुण दिसता.
सर्वप्रथम एक लहान वाटी कच्चे दूध घ्या. यानंतर, कापसावर किंवा बोटांवर दूध घ्या आणि नंतर ते चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार हालचालीत हलक्या हाताने मालिश करा.
आता १०-१५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान २-३ वेळा हे लावा. यामुळे तुमचा चेहरा उजळेल.