Sreeleela: अचानक गर्दीतून एक हात आला अन्...; दार्जिलिंगमध्ये शूटिंगदरम्यान श्रीलीलासोबत घडला धक्कादायक प्रकार

Sreeleela Viral Video: दार्जिलिंगमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री श्रीलीला यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. श्रीलीला एकत्र चालत असताना अचानक एका व्यक्तीने श्रीलीलाला जोरात ओढले.
Sreeleela Viral Video
Sreeleela Viral VideoSaam Tv
Published On

Sreeleela Viral Video: दार्जिलिंगमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री श्रीलीला यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, कार्तिक आणि श्रीलीला एकत्र चालत असताना अचानक एका व्यक्तीने श्रीलीलाला ओढल्याचे दिसते. आचानक या प्रकारामुळे श्रीलीला घाबरली आहे.

शूटिंगदरम्यान कलाकार आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या जातात. मात्र, या घटनेने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या आहेत. श्रीलीलाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे.

Sreeleela Viral Video
Indian Idol 15 winner: मानसी घोषने जिंकला 'इंडियन आयडल १५'चा किताब; रेकॉर्ड केलं पहिलं बॉलिवूड गाणं

श्रीलीला ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक आर्यनसोबत ती पहिल्यांदाच काम करत असून, त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या घटनेनंतर निर्मात्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, कलाकारांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sreeleela Viral Video
Sakman Khan: 'कबीर खान, अली अब्बास जफरसोबत काम कर...' सलमान खानला नाराज चाहत्यांचा सल्ला!

या घटनेने मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी शूटिंगदरम्यान कलाकारांना चाहत्यांच्या उत्सुकतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com