आज (7 जुलै) साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) वाढदिवस आहे. आज ऋषभ शेट्टी 42 वर्षांचा झाला आहे. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'कांतारा: चॅप्टर 1'मुळे(Kantara Chapter 1 New Poster ) चांगलाच चर्चेत आहे. आज वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. 'कांतारा'चा नवीन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.
2022 साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'ने भारतीय सिनेमासृष्टीत एक नवा अध्याय सुरू केला. 'कांतारा'ला मोठे यश मिळाले. 'KGF', 'कांतारा' आणि 'सालार' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या होम्बळे फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली होती. 'कांतारा'ने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाही, तर भारतीय संस्कृती आणि लोक कथांना जागतिक व्यासपीठावर सादर केले. त्यामुळे चाहते आता 'कांतारा: चॅप्टर 1'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ऋषभ शेट्टीच्या अद्याप न पाहिलेल्या शक्तिशाली रूपातील पहिल्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. आता निर्मात्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त आणखी एक नवीन पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या शूटिंगची यशस्वी पूर्णता जाहीर केली आहे. 'कांतारा: चॅप्टर 1' च्या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार पाहायला मिळत आहे.
निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून 'कांतारा: चॅप्टर 1'चे नवीन पोस्टर शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टमध्ये एक अत्यंत भव्य युद्ध दृश्य पाहायला मिळत आहे. 'कांतारा: चॅप्टर 1' चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'कांतारा 2'ला 'कंतारा: अध्याय 1 - ए लीजेंड' असं नाव देण्यात आले आहे. पोस्टरमधील ऋषभ शेट्टीच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.