Rishab Shetty Seeks Blessing From God Panjurli: कन्नड अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भारतासह जगभरात या चित्रपटणे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाची कथा कर्नाटकातील पारंपरिक चालीरीतींवर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथेपासून ते ऋषभ शेट्टीच्या अभिनयापर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आवडल्या.
'कंतारा'च्या उत्तुंग यशानंतर, चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने 'कंतारा'चा दुसरा भाग जाहीर केल्यापासून चाहते खूपच उत्सुक आहेत. चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांसाठी ही खास बातमी. 'कंतारा 2' चे शूटिंग सुरू करण्यापूर्वी अभिनेता ऋषभ शेट्टी भूता कोला फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी त्याच्या 'कांतारा' चित्रपटाच्या यशानंतर देशभरात रातोरात स्टार बनला. पंजुर्ली आणि भूता कोला या स्थानिक देवतांच्या उत्सवावर आधारित या चित्रपटाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केले. आता या चित्रपटाच्या प्रीक्वलच्या शूटिंगपूर्वी ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा पंजुर्ली देवाचे आशीर्वाद घेतले आहेत. भूता कोला फेस्टिव्हलचा व्हिडिओ स्वत: अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ शेट्टी पंजुर्ली देवासोबत दिसत आहे.
ऋषभ शेट्टीने 'कांतारा 2' च्या घोषणेच्या वेळी सांगितले होते की हा चित्रपट 'कांतारा'चा सिक्वेल नसून प्रीक्वल असेल कारण या भागात चित्रपटाची कथा अनेक वर्षांपूर्वी सेट केली जाणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ऋषभ शेट्टी लवकरच 'कांतारा 2' चे शूटिंग सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत शूटिंग सुरू करण्यापूर्वी ऋषभ शेट्टीने भूता कोला फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. (Latest Entertainment News)
महोत्सवात गेलेल्या अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. भूता कोला फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याची ऋषभ शेट्टी ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 20 जानेवारीला ऋषभने दैवी आशीर्वाद घेतले होते. दिग्दर्शक आणि अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो देवाचे 'दर्शन' घेताना दिसला होता. त्यांच्यासोबत 'कांतारा'ची टीम होती.
ऋषभ शेट्टीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की 'कांतारा'चा प्रीक्वलच्या लेखनाला सुरूवात झाली आहे. त्याने सांगितले की प्रीक्वल या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होईल. 'कांतारा'ने माणूस आणि निसर्ग यांच्यातील सततच्या संघर्षाचे सुंदर चित्रण केले आहे. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'कांतारा'ने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली. 'कांतारा'ला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही दाद दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.