Kaun Banega Crorepati 16 
मनोरंजन बातम्या

KBC 16: करोडो रुपये जिंकायचे आहेत? मग अशी करा 'कौन बनेगा करोडपती १६'ची नोंदणी, जाणून घ्या सर्व प्रक्रिया

Bharat Jadhav

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा कौन बनेगा करोडपती हा शो घेऊन येत आहेत. या कार्यक्रमाचा हा १६ वा हंगाम असणार आहे. या सीझनमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी घडणार आहेत. याची झलक अनेक प्रोमोजमध्येही पाहायला मिळालीय. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या शोचा नवीन प्रोमो व्हिडिओ शेअर केलाय. हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीन वाढलीय. या व्हिडिओमध्ये बिग बी त्यांच्या नव्या अंदाजात हॉट सीटसमोर उभे आहेत.

केबीसी १६ मध्ये कशी मिळेल संधी

कौन बनेगा करोडपती सीझन १६ पुढील महिन्याच्या १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 'कौन बनेगा करोडपती' शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला स्पर्धेक बनवावे लागेल. हो, या शोमध्ये तुम्हीही स्पर्धक होऊ शकतात. जाणून घ्या शोचे स्पर्धक होण्याची प्रक्रिया.

संपूर्ण नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या

'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल.

यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Sony Liv ॲप डाउनलोड करावे लागेल.

आता तुम्हाला KBC नोंदणीवर जाऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

प्रश्नोत्तराची उत्तरे दिल्यानंतर जी काही प्रक्रिया केली जाईल, ती पूर्ण करावी लागेल.

यानंतर तुमच्या स्क्रीनवर “Registration Confirm” झालेलं दिसेल.

जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही SMS द्वारे 'कौन बनेगा करोडपती १६' साठी नोंदणी देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन KBC लिहावे लागेल.

त्यानंतर नोंदणी करताना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायमधील पर्याय निवडून द्यावे लागेल. यानंतर तुमचे वय आणि लिंग लिहा आणि 509093 वर पाठवा.

याशिवाय http://www.sonyliv.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता.

तसेच, जेव्हा तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमचे उत्तर बरोबर असेल तेव्हा तुमची निवड केली जाईल. त्यानंतर येथे पोहोचल्यानंतरही ११ जणांची निवड केली जाणार आहे.

या ११ लोकांना सर्वात वेगवान फिंगर फर्स्ट प्रश्न विचारला जाईल, जो कमीत कमी वेळेत अचूक उत्तर देऊ शकेल त्याला बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT