Chetan Bodke
'कौन बनेगा करोडपती' हा टिव्ही शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या ह्या शोचा १५ वा सीझन सुरु आहे.
'केबीसी'चे होस्टिंग बिग बी अमिताभ बच्चन करीत असून या शोची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ आहे.
पण, अमिताभ बच्चन हा शो होस्ट करण्यासाठी किती फी घेतात हे तुम्हाला माहिती आहे का?
या शोची होस्टिंग आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी केली. पण, या शोला तितकी लोकप्रियता मिळाली नाही.
‘कौन बनेगा करोडपती’ शो सुरू झाला तेव्हा बिग बी यांनी हा शो होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडचे २५ लाख रुपये आकारले होते.
तेव्हापासून त्यांनी प्रत्येक सीझनमध्ये आपल्या मानधनामध्ये घसघशीत वाढ केली आहे.
१५ व्या सीझनसाठी बिग बी यांनी प्रत्येक एपिसोडसाठी ४ ते ५ कोटी इतके मानधन आकारले.
या टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून टिव्ही इंडस्ट्रीमध्ये त्यांनी डेब्यू केलं आहे.