Katrina Kaif saam tv
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif : निखळ हास्य अन् चेहऱ्यावर ग्लो; आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच दिसली, पाहा VIDEO

Katrina Kaif Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अलिकडेच गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर कतरिना पहिल्यांदाच स्पॉट झाली आहे.

Shreya Maskar

कतरिना कैफ अलिकडेच आई झाली आहे.

कतरिना कैफने मुलाला जन्म दिला आहे.

आई झाल्यानंतर कतरिना पहिल्यांदाच स्पॉट झाली.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अलिकडेच आई झाली आहे. तिने 7 नोव्हेंबर 2025 ला गोंडस मुलाला जन्म दिला. कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या मुलाचे नाव विहान असे आहे. आई झाल्यानंतर तीन महिन्यांनी, ती पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसली. तिने मास्क घातला होता, पण कॅमेरे पाहून ती हसली. चाहत्यांनी व्हिडिओवर सुंदर कमेंट केल्या आहेत.

आई झाल्यानंतर साडेतीन महिन्यांनी कतरिना कैफ स्पॉट झाली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेले काही महिने कतरिनाने करिअरमधून ब्रेक घेतला आणि ती बाळावर सर्व लक्ष देताना दिसत आहे. कतरिनाच्या चेहऱ्यावरील स्माइल पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सोबत स्पॉट झाली आहे. दोघे एकत्र कारमध्ये बसलेल्या दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कतरिना कैफने चेहऱ्याला मास्क लावला आहे. तिच्या चेहऱ्यावर आई झाल्यानंतरच ग्लो दिसत आहे. कॅमेरा पाहताच कतरिनाने त्यांना हाय केले. तसेच एक सुंदर स्माइल देखील दिली. कतरिनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने लिहिले, "इतक्या दिवसांनी कतरिना दिसली" दुसऱ्याने कमेंट केली, "मी कॅटला पाहून खूप दिवस झाले..." तर अजून एका युजरने लिहिलं की, "तुझी खूप आठवण येते. तू खूपच सुंदर दिसत आहे. "

कतरिना कैफ आणि विकी कौशल 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षांनी त्यांना बाळ झाले. कतरिना कैफच्या आगामी प्रोजेक्टची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तर विकी कौशल आता संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Nasik: नांदूरमधमेश्वर येथे पुराने वेढलेल्या बेटावर अडकलेल्या पाचही जणांना वाचवण्यात यश

Dapoli Waterfalls : कोकणची जादू! दापोलीत लपलेत सुंदर धबधबे, एकदा पाहाल तर पुन्हा पुन्हा जाल

Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

Konkan-Ghavane Recipe : गरमागरम चहा अन् मऊ, जाळीदार घावणे, पावसाळ्यात बनवा अस्सल कोकणी नाश्ता

डोंबिवलीतील शिंदे गटाच्या नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक; डॉक्टरांना मारहाण करणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT