BMC Election 2026: BMC निवडणुकीत सेलिब्रिटी रिंगणात, कोण आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री?

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भाजपने लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला उमेदवारी दिली. मनोरंजनातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या या अभिनेत्रीबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
BMC Election 2026
BMC Election 2026Saam tv
Published On

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत राजकीय व्यक्तीमत्वांव्यतिरिक्त अशा व्यक्तींचं रूपही दिसू लागलं आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप ठेवली आहे. भारतीय जनता पक्षाने आगामी बीएमसी निवडणूक २०२६ साठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांना उमेदवारी दिल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे, ज्याने राजकीय आणि मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत.

निशा परुळेकर यांनी मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण झालं असून आता त्या राजकारणात पदार्पण करून बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 25 मधून भाजपकडून उमेदवारीस उतरणार आहेत. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि राजकीय संघटनांमध्ये गदारोळ दोन्हीच वाढले आहे.

BMC Election 2026
Thalapathy Vijay Falls Down: थलापती विजयचा विमानतळावर अपघात; चाहत्यांच्या गर्दीमुळे जखमी, VIDEO व्हायरल

भाजपने नुकतीच पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात निशा परुळेकर हे नाव देखील समाविष्ट केले आहे. जे अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक मतदारांना विचार करण्यास भाग पाडत आहे. महाराष्ट्रातील राजकारणात या वेळेस खास मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उतरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीचा रंगथोडा बदलत चालला आहे.

BMC Election 2026
Akshaye Khanna: 'सनकी, सर्वांचा अपमान करतो...'; 'या' दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर केले गंभीर आरोप, म्हणाला...

२०२६ निवडणुकीत मतदान 15 जानेवारी २०२६ रोजी होणार असून निकाल 16 जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला जाणार आहे आणि मुंबई महापालिका निवडणूक हे राजकीय रणासाठी एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. एकंदरीत, BMC Election 2026 मध्ये निशा परुळेकर यांचे प्रवेशानंतर आणखी कोणता कलाकार या रंणांगणात उतरणार हे पाहणे उत्सुकाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com