Manasvi Choudhary
नुकतीच बॉलिवूडचे स्टार कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
७ नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी या दोघांच्या आयुष्यात एका नव्या चिमुकल्याने आगमन केलं आहे.
कतरिनाने वयाच्या ४२ व्या वर्षी गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नाच्या चार वर्षांनी आई बाबा झाले आहेत.
९ डिसेंबर २०२१ मध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न केले.
अभिनेत्री कतरिना कैफ ही पती विकी कौशलपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे तिचे सध्याचे वय ४२ वर्ष आहे. तर विकी ३७ वर्षाचा आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि पती विकी कौशल यांच्या वयात ५ वर्षांचे अंतर आहे.