Manasvi Choudhary
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेता नागा चैतन्याबरोबरचं नातं तुटल्यानंतर समांथा तिच्या पर्सनल लाईफमुळे लक्ष वेधून घेते.
समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता नागा चैतन्याने शोभिता धुलिपालाबरोबर लग्न केलं. यामुळेच आता समांथा कधी लग्न करणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
अभिनेत्री समांथा राज निदिमोरूला डेट करत असल्याचं चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर समांथाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये समांथाने राजला घट्ट मिठी मारली आहे. दोघाच्याही चेहऱ्यावर हसू खुललं आहे.
सोशल मीडियावर समांथाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.