Manasvi Choudhary
आज ८ नोव्हेंबर रोजी शुक्र आणि सूर्य ग्रह तूळ राशीत युती करणार आहे. तर वृश्चिक राशीत मंगळ आणि बुध यांचे आगमन शुभ द्विग्रह योग निर्माण करत आहेत.
ज्योतिषशास्त्रामते, जन्मकुंडलीत एकदाच दोन ग्रह स्थित असताना बिग्रह योग तयार होतो यामुळे काही राशींना फायदा होतो. बिग्रह योगामुळे मेष आणि मिथुन राशींना मोठा फायदा होणार आहे.
मेष राशींच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील.
वृषभ राशींसाठी आजचा दिवस कुटुंबासमवेत घालवाल. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांना आज देवी- देवतांचा आशीर्वाद मिळणार आहे. आजचा दिवस थोडा व्यस्त असणार आहे.
कर्क राशींना आज मोठा फायदा होणार आहे. मिथुन राशीत गुरूंचे भ्रमण होणार असणार अपेक्षित लाभ मिळणार आहे.
सिंह राशींच्या व्यक्तींनी आज दानधर्म करावा. कामाच्या ठिकाणी तुमच्यामध्ये काही बदल होतील.
मीन राशीच्या लोकांना आनंदी वैवाहिक जीवन मिळेल तसेच व्यवसायात नफा होणार आहे.
कन्या राशीच्या लोकांना आज वडिलधाऱ्या मंडळीची काळजी घ्यावी लागणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
तूळ राशीच्या लोकांना आज स्पर्धात्मक काम करावे लागणार आहे. व्यवसायात नवीन संधी मिळणार आहे. जोडीदाराकडून आज पाठींबा मिळणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांची आज प्रियंजनाना भेट होईल. दिर्घकाळापासून रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु राशीच्या लोकांना आज खर्च वाढणार आहे. घरखर्चावर नियंत्रण ठेवा. आज कोणत्याही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगायची आहे.
मकर राशीच्या लोकांना आज अपेक्षित नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरची मोठी संधी मिळणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या स्वामी शनीच्या वक्री स्थितीमुळे काही अडचणी देऊ शकतो. अचानक शारीरिक आजार येऊ शकते.