Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या लेकीची चर्चा सुरू आहे.
इंदुरीकर महाराजांची लेक म्हणजेच ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे
सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. या साखरपुडा सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप याच्यासोबत झाला आहे.
यामुळे इंदुरीकर महाराज यांची जावई साहिल चिलाप कोण आहेत असे प्रश्न नेटकरी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल चिलाप हे बांधकाम व्यवसायिक आहे.
साहिल चिलाप यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर आहे. ते सध्या नवी मुंबईत राहतात.