धक्कादायक! 'युट्यूबर बळजबरी शारीरिक संबंध ठेवायचा, महिलेने ऑन कॅमेरा मांडली व्यथा; नेमकं प्रकरण काय?

Shadab Jakati Controversy: धक्कादायक! 'युट्यूबर बळजबरी शारीरिक संबंध ठेवायचा, महिलेने ऑन कॅमेरा मांडली व्यथा; नेमकं प्रकरण काय?
Police investigation underway after a woman levels serious allegations against a Meerut-based YouTuber.
Police investigation underway after a woman levels serious allegations against a Meerut-based YouTuber.Saam Tv
Published On

उत्तरप्रदेश येथील मेरठमध्ये लोकप्रिय युट्युबर शादाब जकाती पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी छत्तीसगडमधील एका महिलेने त्याच्यावर गंभीर आरोपण केले आहेत. पीडित महिलेने सांगितले की व्हिडिओ प्रोमोट करण्यासाठी शादाब जकातशी संपर्क साधला होता. यामध्ये त्यांचे बोलणे वाढत गेले आणि त्यांची मैत्री झाली. मैत्रीचा गैरफायदा उचलून त्याने बलात्कार केला असा पीडितीने आरोप लावला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित महिलेचा आरोप आहे की शादाब जकातीने सुमारे दीड वर्षे तिला घाबरवून-धमकावून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती वारंवार विरोध करत होती. मात्र शादाब तिला धमक्या देत मानसिक दबाव टाकून तिच्यावर अत्याचार करत राहिला. तसेच शादाब जकातीची पत्नीही तिच्यासोबत मारहाण करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. शादाब आणि त्याची पत्नी दोघांनी मिळून अनेकदा तिच्यावर शारीरिक हिंसा केल्याचेही ती सांगते. एवढेच नाही तर पीडितेच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप आहे.

Police investigation underway after a woman levels serious allegations against a Meerut-based YouTuber.
Crime News : धक्कादायक! शिक्षकाची विद्यार्थिनीवर पडली वाईट नजर; वर्गात एकटं गाठून केलं भयंकर कृत्य

पीडिता सोशल मीडियाशी संबंधित

पीडित महिला स्वतः सोशल मीडियावर सक्रिय असून फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवते. याच सोशल मीडिया कामाच्या निमित्ताने प्रमोशनसाठी तिने शादाब जकातीशी संपर्क साधल्याचे ती सांगते. शादाब जकातीमुळे तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवाला धोका असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेचा पती सध्या दिहाडी मजुरी करतो आणि तो अत्यंत भयभीत अवस्थेत आहे. कुटुंबाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

इंचौली पोलीस ठाण्यात तक्रार

पीडित महिलेने मेरठ येथील इंचौली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार (तहरीर) दाखल करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे प्रकरणाची चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com