Crime News : धक्कादायक! शिक्षकाची विद्यार्थिनीवर पडली वाईट नजर; वर्गात एकटं गाठून केलं भयंकर कृत्य

Latur Crime News : लातूरमधील खासगी ट्यूशन क्लासमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : धक्कादायक! शिक्षकाची विद्यार्थिनीवर पडली वाईट नजर; वर्गात एकटं गाठून केलं भयंकर कृत्य
Latur Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • लातूरमधील खासगी ट्यूशन क्लासमध्ये धक्कादायक प्रकार

  • शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप

  • शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल

  • पालकांमध्ये तीव्र संताप, मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न

संदीप भोसले, लातूर

लातूर शहरातून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे “मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” अशी भाषा वापरत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील ट्यूशन एरिया परिसरातील एका खासगी क्लासेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक विद्यार्थिनी ट्युशनसाठी संबंधित शिक्षकाच्या क्लासमधील हॉलमध्ये आली. यावेळी शिक्षकाने हॉलमधील एकांताचा गैरफायदा घेत तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीनी केला.

Crime News : धक्कादायक! शिक्षकाची विद्यार्थिनीवर पडली वाईट नजर; वर्गात एकटं गाठून केलं भयंकर कृत्य
Gujrat : होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिका भडकली; विद्यार्थीनीच्या कानाखाली मारली अन्...; न्यालयाने सुनावली भयंकर शिक्षा

आरोपी शिक्षकाने “मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” अशी भाषा वापरत संबंधित पीडितेला धमकावलं. पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार आरोपी शिक्षकाच्या विरोधात पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Crime News : धक्कादायक! शिक्षकाची विद्यार्थिनीवर पडली वाईट नजर; वर्गात एकटं गाठून केलं भयंकर कृत्य
Kokan Railway News : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? मुंबईतून विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक काय? तिकीट बुकिंग कधी करता येणार?

या तक्रारीनुसार संबंधित शिक्षकाविरोधात शिवाजीनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com