Fashion Designer Arrested Saam tv
मनोरंजन बातम्या

Fashion Designer Arrested: आधी प्रेमाचं नाटक, मग लॉजवर बोलवून...; प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे धक्कादायक कारनामे समोर

Fashion Designer Arrested: कर्नाटकच्या बेळगावी येथे फॅशन डिझायनर दीपा अवतागीला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या तिच्या फरार साथीदाराचा शोध घेत आहेत.

Shruti Vilas Kadam

Fashion Designer Arrested: कर्नाटकातील बेळगावी येथे सोशल मीडियावर श्रीमंत पुरुषांना जाळ्यात ओढून फसवणूक करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला आधी मैत्री करायची, नंतर प्रेमाचे नाटक करत पुरुषांना लॉजवर बोलावायची आणि योग्य संधी साधून त्यांची रोकड, सोने तसेच वाहने घेऊन पसार व्हायची. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव  दीपा अवतागी (वय 33) असे आहे. ती मूळची कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी असून व्यवसायाने फॅशन डिझायनर असल्याची माहिती समोर आली आहे. टिळकवाडी पोलीस ठाणे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून तिला अटक केली.

तपासात उघड झाले की, ही महिला प्रामुख्याने इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर श्रीमंत आणि प्रभावशाली पुरुषांना टार्गेट करायची. सुरुवातीला ती मैत्री करून त्यांच्याशी गप्पा मारायची आणि हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करायची. त्यानंतर प्रत्यक्ष भेटण्याचा प्रस्ताव देत ती त्यांना लॉज किंवा हॉटेलमध्ये बोलावायची.

पीडित व्यक्ती लॉजवर आल्यानंतर ती त्यांच्याशी काही काळ गप्पा मारून वातावरण सहज बनवायची. त्यानंतर एखाद्या कारणाने त्यांना अंघोळीसाठी किंवा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये पाठवायची. त्या दरम्यान ती खोलीत ठेवलेली रोकड, दागिने, बॅगा आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून जायची. काही केसमध्ये तर ती पीडितांची कार घेऊनही पसार झाल्याचे समोर आले आहे.

इतक्यावरच हा प्रकार थांबत नव्हता. वस्तू घेऊन पळाल्यानंतर ती पीडितांना फोन करून पैसे मागायची. पैसे दिल्यास गाडी किंवा सामान परत देऊ, असे सांगून ती पुन्हा पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पैसे देण्यास नकार दिल्यास पोलीस तक्रार करून बदनामी करण्याची धमकीही ती देत असे.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना तिचा एक साथीदार असल्याचा संशय आहे. या साथीदाराचे नाव शिवानंद मतपेटी असे असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. या हनीट्रॅप प्रकरणात आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचाही तपास सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT