Kareena Kapoor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

kareena-Kolhapuri Chappal : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ती कोल्हापुरी चप्पल घालून आपला देसी स्वॅग दाखवताना दिसत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) कायम आपल्या हटके स्टाइलमुळे चर्चेत असते. तिला बॉलिवूडची बेबो या नावाने ओळखले जाते. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. सध्या करीनाची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये करीना कपूर कोल्हापूरी चप्पल घालून दिसत आहे.

करीना कपूर खानने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. स्टोरीमधून तिने एका लग्जरी ब्रँडवर टीका केली असून भारतीय कलेला पाठिंबा तसेच कौतुक केले आहे. करीनाने बीचवर बसलेल्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आपली कोल्हापूरी चप्पल दाखवत आहे. तिने याला एक खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "सॉरी प्राडा नाही…पण माझे ओजी कोल्हापुरी" (Kolhapuri Chappal) करीना कपूरचा हा देसी स्वॅग प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

करीना सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्टीत एन्जॉय करत आहे. तिने बीचवर आराम करताना दिसत आहे. तिने पायांत चमकदार चंदेरी रंगाच्या कोल्हापुरी चप्पल परिधान केल्या आहेत. करीनाच्या या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच आपल्या भारतीय कलेचा अभिमान बाळगला आहे.

Kareena Kapoor

नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून प्राडाला (PRADA) भारतात निषेधांचा सामना करावा लागत आहे. प्राडाने अलीकडेच पुरुषांच्या चप्पलांचे नवीन कलेक्शन सादर केले. त्यातील चप्पल भारतीय कोल्हापुरी चप्पलसारखी दिसत होती. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. असे बोले गेले की, "आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतीय कलेला श्रेय न देता त्याचा वापर करतात. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन

Maratha Reservation: खाऊगल्ली का बंद होती? व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

John Cena: जॉन सीना WWE मधून घेणार निवृत्ती? कधी खेळणार शेवटचा सामना?

Horoscope Tuesday: या राशीने वाद टाळा, काही राशींना प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maratha Reservation: चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर मार्ग काढू; आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT