Manasvi Choudhary
अस्सल कोल्हापुरी चप्पल ओळखताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावा हे जाणून घेऊया.
कोल्हापुरी चप्पल ही चामड्यापासून बनवलेली असते. हाताने शिवलेली ही चप्पल मऊ, टिकाऊ आणि पायाला आरामदायी असते.
कोल्हापुरी चपल्ल हि हातानेच बनवतात यामुळे त्या तपासताना त्याचे शिवणकाम, वीण आणि काठ पाहून घ्या.
ओरिजनल कोल्हापुरी चप्पल ही रंगावरून देखील ओळखली जाते. अस्सल कोल्हापुरी चप्पल नैसर्गिक असा तेलकट किंवा पॉलिश चामड्याचा वापर असतो.
डुप्लिकेट चामड्याचा चप्पलला सौम्य असा वास येतो यामुळे देखील तुम्ही ओरिजनल चप्पल सहजपणे ओळखू शकता.
हलक्या दर्जाच्या चामड्यापासून बनवलेल्या कोल्हापुरी चपला या ओरिजनल नसतात काळे डाग देखील असतात.
कोल्हापुरी चप्पल वजनदार असते. सहसा हातात घेतली की इतर पादत्राणांपेक्षा जड असते.
अस्सल कोल्हापुरी चप्पलची टाच आणि अंगठे हे मजबूत असतात. चप्पलवरची कलाकुसर ही बारीक आणि आकर्षक दिसते.