Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' 300 कोटींच्या उंबरठ्यावर, तर वरुणच्या 'सनी संस्कारी' चित्रपटाच्या कमाईत सोमवारी घसरण

Kantara Chapter 1 vs Sunny Sanskari Ki Tulsi Kumari : 'कांतारा चॅप्टर 1' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहे. 'कांतारा' लवकरच 300 कोटींचा टप्पा गाठणार आहे.

Shreya Maskar

'कांतारा चॅप्टर 1' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाले.

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' लवकरच 300 कोटींचा टप्पा गाठणार आहे.

मात्र सोमवारी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' च्या कमाईत घट झाली आहे.

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला. याच दिवशी वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari ) हा चित्रपट रिलीज झाला आहे. 'कांतारा चॅप्टर 1' लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाच्या कलेक्शमध्ये सोमवारी घसरण पाहायला मिळाली आहे. चित्रपटांचे पाचव्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने पहिल्या सोमवारी 30.50 कोटी रुपये कमावले. पाच दिवसांत चित्रपटाने भारतात एकूण 255.75 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने सोमवारी 72.70 टक्के कन्नड, 36.52 टक्के तेलुगू , 17.67 टक्के हिंदी, 43.13 टक्के तमिळ, आणि 40.01 टक्के मल्याळम ऑक्युपन्सी मिळवली आहे.

  • दिवस पहिला - 61.85 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 45.4 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 55 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 61 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 30.50 कोटी रुपये

  • एकूण - 255.75 कोटी रुपये

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाने सोमवारी म्हणजे रिलीजच्या पाचव्या दिवशी निराशाजनक कमाई केली आहे. चित्रपटाने फक्त 3 कोटी रुपये कमावले आहे. पाच दिवसांत चित्रपटाने एकूण 33 कोटी रुपये कमावले आहेत.

  • दिवस पहिला - 9.25 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 5.5 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 7.5 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 7.75 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 3 कोटी रुपये

  • एकूण - 33 कोटी रुपये

'कांतारा चॅप्टर 1' vs 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'

'कांतारा चॅप्टर 1' चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे.'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. तर 'सनी संस्कारी' मध्ये वरुण धवनसोबत जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'कांतारा चॅप्टर 1'चा पहिला भाग 'कांतारा' 2022 मध्ये रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, २५३ तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Nashik Corporation : नाशिक महापालिकेसाठी ९ वर्ष जुन्या प्रभाग रचनेलाच मंजुरी; निवडणूक ठरणार चुरशीची, कोणत्या पक्षाला होणार फायदा?

Rohit sharma: आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये! कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचा जुना Video होतोय व्हायरल

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांसाठी मोठी मदत, देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Political News : ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

SCROLL FOR NEXT