Ahaan Panday : 'सैयारा'नंतर अहान पांडेला मोठ्या चित्रपटाची लॉटरी, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स?

Ahaan Panday Upcoming Movie : 'सैयारा' नंतर अहान पांडे लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.
Ahaan Panday Upcoming Movie
Ahaan PandaySAAM TV
Published On
Summary

अहान पांडेच्या 'सैयारा' चित्रपटाने जगभरात भरपूर यश मिळवले आहे.

'सैयारा' नंतर अहान पांडे एका मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अहान पांडेसोबत चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अहान पांडे (Ahaan Panday) त्याच्या 'सैयारा' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'सैयारा'ची क्रेझ आजही पाहायला मिळते. 'सैयारा'ची गाणी सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. 'सैयारा'मध्ये अहान पांडे अभिनेत्री अनीत पड्डासोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाला. त्यांच्या जोडीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अशात आता अहान पांडेच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

अहान पांडेच्या आगामी चित्रपटात तो मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत झळकणार असल्याचे बोले जात आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माते अली अब्बास जफर यांच्या आगामी ॲक्शन रोमान्स चित्रपटासाठी अहान पांडे शर्वरी वाघसोबत काम करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून चित्रपटाचे नावही जाहीर करण्यात आले नाही आहे.

2024 मध्ये रिलीज झालेल्या 'मुंज्या' चित्रपटात शर्वरी वाघने काम केले आहे. या चित्रपटीने बक्कळ कमाई केली. लवकरच शर्वरी वाघ 'अल्फा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध कलाकार आलिया भट्ट देखील झळकणार आहे. प्रेक्षक ही नवीन जोडी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सैयारा

'सैयारा' हा चित्रपट आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लेटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. 'सैयारा' 18 जुलैला रिलीज झाला आहे. 'सैयारा'चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. 'सैयारा' हा रोमँटिक ड्रामा आहे.

Ahaan Panday Upcoming Movie
मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची बहीण 'Bigg Boss 19'च्या घरात, पहिलाच एपिसोड पाहून नेटकरी काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com