Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Santosh Juvekar: मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर सतत त्याच्या वक्यव्यांमुळे चर्चेत असतो. आता लवकरच संतोष एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Santosh Juvekar
Santosh JuvekarSaam Tv
Published On
Summary

संतोष जुवेकरची मराठी चित्रपटात एन्ट्री

साकारणार खास भूमिका

२ महिन्यांनंतर चित्रपट होणार प्रदर्शित

Santosh Juvekar: मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर सतत त्याच्या वक्यव्यांमुळे चर्चेत असतो. आता लवकरच संतोष एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित नवीन मराठी चित्रपट “स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, या सिनेमात संतोष जुवेकरची खास भूमिका असणार आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये संतोष जुवेकरचा लुक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोय. त्याची शहरी झलक आणि कथेत असलेली गूढता यामुळे प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. “ही स्मार्ट सुनबाई कोण? आणि तिच्या आयुष्यात काय घडणार?” या प्रश्नाभोवती फिरणाऱ्या या कथेत संतोष जुवेकर महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

Santosh Juvekar
Salman Khan: सलमान खान गुन्हेगार आहे...; दबंग दिग्दर्शकाने खान कुटुंबावर लावले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

या चित्रपटात रोहन पाटील, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, किशोरी शहाणे, उषा नाईक यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत संतोष जुवेकर काम करताना दिसणार आहे. इतक्या मोठ्या कलाकारांच्या रांगेत त्याची उपस्थिती या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे.

Santosh Juvekar
Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांचे असून, संगीत विजय नारायण गवंडे, साई-पियुष यांनी दिले आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड यांच्या गीतांना अजय गोगावले, वैशाली माढे, सावनी रवींद्र यांसारख्या गायकांचे स्वर लाभले आहेत.“स्मार्ट सुनबाई” हा सिनेमा रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ घालणारा असल्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला आपलासा वाटेल. संतोष जुवेकरच्या खास अभिनयामुळे या सिनेमात एक वेगळं आकर्षण नक्कीचं निर्माण होणार आहे. २१ नोव्हेंबरपासून “स्मार्ट सुनबाई” महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय आणि यात संतोष जुवेकरचा अभिनय हा प्रेक्षकांसाठी नक्कीचं एक मोठा ट्रीट ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com