Kantara Chapter 1 Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा 'चा धुराळा; विजयच्या 'GOAT'ला पछाडलं, 500 कोटींच्या उंबरठ्यावर

Kantara Chapter 1 box office collection day 13: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1'ने विजयच्या GOAT चित्रपटाला मागे टाकले आहे. 'कांतारा चॅप्टर 1'ने 13व्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'कांतारा चॅप्टर 1' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1'ने विजयच्या GOAT चित्रपटाला मागे टाकले आहे.

'कांतारा चॅप्टर 1' लवकरच भारतात 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार आहे.

ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. 'कांतारा चॅप्टर 1' चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले आहे. 'कांतारा चॅप्टर 1' इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. चित्रपट लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' ने 13 व्या दिवशी भारतात अंदाजे 13.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 465.25 कोटी रुपये झाले. त्यासोबत 'कांतारा चॅप्टर 1'ने 'गोट' या चित्रपटाला मागे टाकले आहे. विजयच्या द गोटच्या (GOAT) ची जगभरातील कमाई (457 कोटी रुपये) ओलांडली आहे. 'कांतारा चॅप्टर 1' पहिल्या आठवड्यात 337.4 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 13.35 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 13

  • दिवस पहिला - 61.85 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 45.40 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 55.00 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 63.00 कोटी रुपये

  • दिवस पाचवा - 31.50 कोटी रुपये

  • दिवस सहावा- 34.25 कोटी रुपये

  • दिवस सातवा - 25.25 कोटी रुपये

  • दिवस आठवा - 21.15 कोटी रुपये

  • दिवस नववा - 22.00 कोटी रुपये

  • दिवस दहावा- 39 कोटी रुपये

  • दिवस अकरावा- 39 कोटी रुपये

  • दिवस बारावा- 13.35 कोटी रुपये

  • दिवस तेरावा- 13.5 कोटी रुपये

  • एकूण - 465.25 कोटी रुपये

'कांतारा चॅप्टर 1' ओटीटी रिलीज

मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओने स्ट्रीमिंग अधिकार 125 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. 'कांतारा चॅप्टर 1'ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही आहे. मात्र चित्रपट पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत ओटीटीवर येईल असे बोले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेल्मेटच्या विविध रंगामध्ये लपलंय खास सिक्रेट; वाचा कोणत्या रंगाचा काय अर्थ?

Moon: जगात सर्वप्रथम चंद्र कुठे दिसतो?

Maharashtra Live News Update: राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

संग्राम जगताप म्हणाले हिरव्या सापाला ठेचण्याची वेळ आली, अजित पवारांनी काढले वाभाडे, नेमकं काय म्हणाले?

Pune Shopping : कंदील, फटाके, कपडे; सर्वकाही मिळेल स्वस्तात मस्त, पुण्यातील 5 प्रसिद्ध शॉपिंग मार्केट्स

SCROLL FOR NEXT