Kangana Ranaut-Aishwarya Rai  saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut-Aishwarya Rai : "ती तुम्हाला खुश करण्यासाठी इथे आलेली नाही..."; ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना कंगना रणौत यांचं सडेतोड उत्तर

Kangana Ranaut On Aishwarya Rai Cannes Look : ऐश्वर्या राय बच्चनने 'कान्स' च्या रेड कार्पेटवर आपल्या लूक आणि सौंदर्याने चारचाँद लावले मात्र तिला आपल्या वयावरून आणि वजनावरून ट्रोल केले गेले. यावर आता कंगना रणौत यांनी ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

Shreya Maskar

ऐश्वर्या रायने 'कान्स' च्या रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री घेतली.

वाढलेल्या वजनामुळे ऐश्वर्या रायला ट्रोल करण्यात आले.

ऐश्वर्या रायला ट्रोल करणाऱ्यांना कंगना रणौत यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.

'कान्स फिल्म फेस्टिवल 2026' मध्ये बॉलिवूडसोबतच मराठी कलाकारांनीही उपस्थिति दाखवली. आपल्या सौंदर्याने आणि हटके स्टाइलने प्रेक्षकांना वेड लावले. 'कान्स' चे शेवटचे दिवस सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या लूकने गाजवले. तिला पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. मात्र ऐश्वर्याला आपल्या लूकमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

ऐश्वर्या रायने 'कान्स'मधील एका लूकमध्ये निळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. त्यात ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. मात्र काही नेटकऱ्यांनी तिला वजनावरून आणि रुपावरून ट्रोल केले. मात्र बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रणौत यांनी ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

कंगना रणौत यांनी यांनी रविवारी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यात त्यांनी ऐश्वर्याच्या दिसण्यावर आणि वजनावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर जोरदार टीका केली. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी या पोस्टचे समर्थन करत आहे. अभिनेत्रीने ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स' लूकचा फोटो स्टोरीला पोस्ट केला आणि त्याच्याखाली एक मेसेज लिहून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.

कंगना रणौत यांची स्टोरी

"फॅशन आणि स्टाइल हा स्वतःच्या अभिव्यक्तीचाच एक प्रकार आहे. ती म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा आणि स्वतःच्या वृत्तीचा प्रत्येकाचा स्वतःचाच अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे. कोणत्याही स्त्रीचे कोणाशीही काहीही देणे लागत नाही. 'ऐश' (Ash) तर अतिशय सुंदर दिसत आहे! तुमच्यापैकी ज्यांना तिला वेगळ्याच रूपात पाहायचे आहे, त्यांनी मग स्वतःमध्ये काय कर्तृत्व आहे ते का दाखवून देत नाही? ती तुम्हाला खुश करण्यासाठी इथे आलेली नाही; ती स्वतःच एक अत्यंत तेजस्वी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्व आहे. जर तुम्हाला 'रेड कार्पेट'वर वयस्कर स्त्रियांना पाहण्याची सवय नसेल, तर आता ती सवय लावून घ्या.

धन्यवाद..."

kangana ranaut

कंगना रणौत आगामी प्रोजेक्ट

कंगना रणौत या सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'भारत भाग्य विधाता' याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मनोज तापडिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्यावर आधारित असून, तो १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकीकडे 47°C उष्णतेचा तडाखा, दुसरीकडे मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकं|VIDEO

Maharashtra News Live Update: मुंबई आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात , सहा जणांचा मृत्यू

आंबा खाल्ल्यानंतर पोट बिघडतं? मग 'या' चुका टाळाच, वाचा तज्ञांचा सल्ला...

Pune : एसटी बसने दुचाकीला चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, पुण्यात भयंकर अपघात

साखर झोपेत असताना काळाचा घाला! मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT