'कान्स'मध्ये मॉडेलवर हल्ला
मॉडेलने व्हिडीओ शेअर करून दिली माहिती
मॉडेलच्या चेहऱ्यावर जखमा आणि रक्त पाहायला मिळत आहे.
'कान्स फिल्म फेस्टिवल' ची धामधूमीत एक भयंकार घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सौंदर्यवती अँड्रिया डेल व्हॅलने प्रसिद्ध स्टायलिस्ट जिओव्हानी लगुनावर कान्सच्या दौऱ्यादरम्यान तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. अँड्रियाने सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमा स्पष्ट दिसत आहेत आणि रक्त वाहताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. जे पाहून नेटकरी चिंतेत दिसत आहे.
व्हिडिओमध्ये अँड्रिया एका हॉटेलच्या रुममध्ये व्हिडीओ बनवताना दिसत आहे. ज्यात ती स्वतः खूपच जखमी झाली आहे. तर जिओव्हानी लगुना पार्श्वभूमीत बसलेला दिसत आहे. तिने आपल्या अवस्थेसाठी थेट त्याला जबाबदार धरले. व्हिडीओत ती म्हणाली की, "हे सर्व जिओव्हानी लगुनाने हे केले आहे...तो खरोखर कोण आहे, हे लोकांनी अखेर पाहावे..." त्यांच्यातल्या या वादाचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने व्हेनेझुएला आणि मेक्सिकोच्या अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना 'कान्स फिल्म फेस्टिवल' दरम्यान घडली असल्याचे बोले जात आहे. कारण दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आलिशान हॉटेलमध्ये थांबलेल्या इतर पाहुण्यांनी खोलीतून मोठ्याने ओरडण्याचे आणि भांडणाचे आवाज ऐकले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की हॉटेलमधील पाहुण्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. नंतर फ्रेंच पोलिसांनी हस्तक्षेप केला. तसेच ऑनलाइन आरोप समोर आल्यानंतर जिओव्हानी लागुना यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
घटनेनंतर अँड्रियावर तिच्या जखमांवर उपचार करण्यात आले आणि ती आता सुरक्षित असल्याचे वृत्त समोर आले. सोशल मीडिया वापरकर्ते या क्लिप्सवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. जिओव्हानी लागुना हे लॅटिन अमेरिकन फॅशन आणि सौंदर्य क्षेत्रात बरेच प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी गेल्या काही वर्षांत सेलिब्रिटी, मॉडेल्स आणि सौंदर्य राण्यांसोबत काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.