Accident News : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, अनेकजण जखमी

Bus Accident News : गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी एसटी बस मुरखला गावाजवळ उलटून अपघात झाला. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडून अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
GADCHIROLI ST BUS ACCIDENT: MULTIPLE PASSENGERS INJURED NEAR MURKHALA
GADCHIROLI ST BUS ACCIDENT: MULTIPLE PASSENGERS INJURED NEAR MURKHALASaam Tv
Published On
Summary
  • गडचिरोली-उमरखेड मार्गावर एसटी बसचा अपघात

  • मुरखला गावाजवळ बस उलटून अनेक प्रवासी जखमी

  • स्थानिक आणि प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य

  • अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा आज सकाळी मुरखला गावाजवळ अपघात झाला. बस अचानक रस्त्याच्या कडेला उतरून उलटल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला गेली. अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

GADCHIROLI ST BUS ACCIDENT: MULTIPLE PASSENGERS INJURED NEAR MURKHALA
Smoking Alert : एका सिगारेटमुळे पुरुष आणि महिलांचे आयुष्य कमी होते, कसं? जाणून घ्या

अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असली तरी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

GADCHIROLI ST BUS ACCIDENT: MULTIPLE PASSENGERS INJURED NEAR MURKHALA
Shocking : भयंकर! पत्नीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या पतीने काढला काटा; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे. बस रस्त्याच्या कडेला का उतरली, यामागे चालकाची चूक, वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा रस्त्याची खराब अवस्था यापैकी नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com