Kangana Ranaut And Chirag Paswan Affair Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: रोमान्स केला असता तर आम्हाला मुलं झाली असती, चिराग पासवानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली कंगणा रणौत

Kangana Ranaut And Chirag Paswan Relationship: कंगना रणौत आणि चिराग पासवान यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर पहिल्यांदाच कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली.

Priya More

Summary -

  • कंगना रणौतने चिराग पासवानसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच खुलासा केला

  • प्रतिक्रिया देत तिने अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला

  • आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असे तिने सांगितले

  • कंगनाच्या मजेशीर वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रणौत पुन्हा चर्चेत आली आहे. कंगना रणौतने केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबत असलेल्या नात्यावर पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली. 'रोमान्स केला असता तर आम्हाला मुलं झाली असती', असं विधान तिने केले आहे. कंगना रणौतच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कंगनाने पहिल्यांदाच चिरागसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला.

कंगना रणौत आणि चिराग पासवान याचे अफेअर सुरू असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. जेव्हा जेव्हा हे दोघे संसदीय किंवा पक्षाच्या कामासाठी भेटतात तेव्हा त्यांचे एकत्रित असलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी हसताना, तर कधी एकमेकांना टाळी देताना तर कधी एकमेकांना मिठी मारतानाचे त्याचे फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंवरून दोघांच्या अफेअरच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून पसरल्या होत्या. पण आता कंगनाने यावर प्रतिक्रिया देत नात्याच्या चर्चांना पूर्णविराम दिले.

कंगना रणौतने स्पष्टपणे सांगितले की, 'चिराग पासवान हा माझा फक्त एक चांगला मित्र आहे. त्याहून अधिक काहीही नाही. जेव्हा कधी मी त्याचा विचार करते तेव्हा तो मला एक मित्र म्हणूनच दिसतो. आमच्यात कधीच कोणतेही प्रेमसंबंध नव्हते. आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आम्ही १० वर्षांपूर्वी एकत्र चित्रपट केला होता. जर आमच्यात रोमान्स झाला असता तर आतापर्यंत आम्हाला मुलं झाली असती. जर प्रेम व्हायचं असतं तर ते आतापर्यंत झालं असतं.'

कंगना रणौतने चिराग पासवानसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्यात फक्त मैत्रीचे नाते आहे. प्रेमसंबंध नाही.' कंगनाच्या मनमोकळ्या आणि मजेशीर शैलीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, कंगना रणौतने 'मिले ना मिले हम' चित्रपटामध्ये चिराग पासवानसोबत काम केले होते. या चित्रपटातून चिराग पासवानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तनवीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात कंगना, चिराग यांच्यासोबत नीरू बजाज आणि सागरिका घाटगे यांनी देखील काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी देखील कंगना आणि चिरागची तिथून सुरू झालेली मैत्री आजही टिकून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT