Kangana Ranaut: 'माझ्या रेस्टॉरंटने काल ५० रुपयांची कमाई...'; कंगना राणौतचं हिमाचल पूरग्रस्तांसमोर रडगाणं, VIDEO व्हायरल

Kangana Ranaut Viral Video: मंडी येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी गुरुवारी हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी पीडितांसमोर स्वत: रडगाणं मांडलं.
Kangana Ranaut Viral Video
Kangana Ranaut Viral VideoSaam Tv
Published On

Kangana Ranaut Viral Video: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आहे. अलिकडच्या काळात हिमाचल प्रदेशातील अनेक भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, काल कंगना पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी मंडी येथे पोहोचल्या होत्या. तिथे असे काही घडले ज्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.

मंडी येथील भाजप खासदार कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त लोकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्थानिक युट्यूबरला मुलाखत देत असताना, जवळच्या लोकांनी कंगनाला काही प्रश्न विचारले आणि या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Kangana Ranaut Viral Video
Pawan Singh: कुटुंब अचानक सेटवर आले अन्...; पॉवरस्टार पवन सिंहने मध्येच सोडला 'राईज अँड फॉल' शो

"५० रुपयांची कमाई, १५ लाख रुपयांचा पगार"

व्हिडिओमध्ये कंगनाला सार्वजनिक समस्यांबद्दल प्रश्न विचारले जाते, ज्याचे उत्तर ती वेगळीच देते. तिने सांगितले की मनालीमधील तिच्या रेस्टॉरंटने काल फक्त ५० रुपयांची कमाई केली, तर तिचा पगार आणि देखभाल खर्च १५ लाख रुपयांचा आहे. मंडीच्या खासदार कंगना राणौत आपत्तीनंतर मनाली येथे आल्या आणि त्यांनी सोलांग नाला परिसराला भेट दिली. तिने भूस्खलनामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांची भेट घेतली. या दरम्यान, एका युट्यूबरने झालेल्या नुकसानीबद्दल तक्रार केली तेव्हा कंगनाने त्यांना माझ्या रेस्टॉरंटने देखील काल फक्त ५० रुपयांची कमाई केली त्याचा देखभाल खर्च १५ लाख रुपयांचा आहे. माझी अडचण देखील समजा असे उत्तर दिले.

Kangana Ranaut Viral Video
Jolly LLB 3 BO Collection: अक्षय कुमारचा चित्रपट ब्लॉकबस्टर ओपनिंगसाठी सज्ज; 'जॉली एलएलबी 3' करणार का रेकॉर्ड ब्रेक कमाई?

"मी एक सिंगल वूमन आहे... माझ्या अडचणी समजा"

कंगना म्हणाली, "तुम्ही माझ्यावर हल्ला करण्यासाठी किंवा मला प्रश्न विचारण्यासाठी आला आहात का? हल्ला करू नका, प्रश्न विचारा. आम्हीही या ठिकाणचे रहिवासी आहोत. जर तुम्ही आम्हाला त्रास देण्यासाठी आलात तर कसे चालणार?" प्रथम, शांत व्हा आणि समजून घ्या की माझेही येथे घर आहे. मला काय सहन करावे लागत असेल? माझेही इथे एक रेस्टॉरंट आहे. काल मी ५० रुपयांचा व्यवसाय केला. मी फक्त १५ लाख रुपये कमवते आणि मी ५० रुपयांचा व्यवसाय केला. मला काय सहन करावे लागत असेल? कृपया माझे दुःख समजून घ्या. मी देखील एक माणूस आहे. मी या समाजात एक सिंगल वूमन आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com