Jolly LLB 3 BO Collection: अक्षय कुमारचा चित्रपट ब्लॉकबस्टर ओपनिंगसाठी सज्ज; 'जॉली एलएलबी 3' करणार का रेकॉर्ड ब्रेक कमाई?

अर्शद वारसी आणि अक्षय कुमार स्टारर हा चित्रपट पहिल्या दिवशी ५ कोटी कमाई करू शकेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर "अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी" आणि "निशांची" या दोन इतर चित्रपटांशी स्पर्धा करत आहे.
Jolly LLB 3
Jolly LLB 3Saam Tv
Published On

Jolly LLB 3 BO Collection Prediction: अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या “Jolly LLB 3” या कोर्टरुम कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेली ही फिल्म बॉक्स ऑफिस चांगलीचं कमाई करु शकते. आता या चित्रपटाच्या ओपनिंगसाठी वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत. काही लोकांना वाटते की हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कमी कमाई करेल तर काहींना वाटते की हा चित्रपट अनेक रेकोर्ड ब्रेक करेल.

फिल्मची एडव्हान्स बुकिंग चांगली सुरू आहे. काही रिपोर्ट्सनुसार, शो-संख्या वाढवण्याची गरज आहे. काही विश्लेषक असा विचार करत आहेत की जर वर्ड-ऑफ-माउथ (लोकांनी एकमेकांना सांगणे) आणि पहिल्या दिवसाच्या प्रतिक्रिया सकारात्मक राहिल्या, तर “जॉली एलएलबी 3” चा पहिला दिवस ८-१० कोटी पर्यंतचा विक्रम नोंदवू शकतो.

Jolly LLB 3
Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

दुसरीकडे काही अंदाजांमध्ये सांगितले जात आहे की सुरूवात अपेक्षेप्रमाणे जोरदार नसेल; अशी शक्यता आहे की ओपनिंग दिवशी कमाई ५ कोटीच्या आसपास होईल. 120 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जर पहिल्या दिवशी ५ कोटी कमावले तर कदाचित हा चित्रपट बजेट वसुली करु शकणार नाही.

Jolly LLB 3
Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

सुभाष कपूर दिग्दर्शित, जॉली एलएलबी 3 मध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला, अमृता राव, गजराज राव, सीमा बिस्वास आणि सुशील पांडे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपटासह ९ सप्टेंबर रोजी "अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी" आणि "निशांची" हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com