Shreya Maskar
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत यांनी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती शिवभक्तीत तल्लीन पाहायला मिळत आहे.
कंगना रणौत या महादेवाच्या मोठ्या भक्त आहेत. नुकतेच त्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा करतानाचे खास फोटो शेअर केले. आपला 12 ज्योतिर्लिंगांचा ऐतिहासिक प्रवास सांगितला.
कंगना रणौत या पारंपरिक लूकमध्ये मंदिरात दिसल्या. त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्या आजूबाजूला पर्यटकांची मोठी संख्या पाहायला मिळाली.
फोटोंध्ये कंगना रणौत या ज्योतिर्लिंगावर दुधाने अभिषेक करताना दिसत आहेत. तसेच मनोभावे पूजा करत आहेत. अभिनेत्री महादेवाच्या ध्यानात मग्न असताना दिसत आहे.
सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथ, विश्वेश्वर (काशी), त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, आणि घृष्णेश्वर ही भारतातील 12 ज्योतिर्लिंग आहेत.
कंगना रणौत या भाजपाच्या खासदार आहेत. कायम महिलांसाठी काम करताना त्या दिसतात. आपली मते स्पष्ट मांडतात. राजकारणात त्यांचे मोठे नाव आहे.
कंगना रणौत यांनी 2006 साली रिलीज झालेल्या 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात त्यांनी इम्रान हाश्मीसोबत काम केले.
क्रिश ३, तनु वेड्स मनु रिटर्न्स, क्वीन, मणिकर्णिका, फॅशन, गँगस्टर, राझ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.