Kalki 2898 AD Total Worldwide Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kalki Movie Box Collection: ‘कल्की २८९८ एडी’ ची १००० कोटींकडे वाटचाल, लवकरच ‘जवान’चाही रेकॉर्ड मोडणार

Kalki 2898 AD Movie Total Worldwide Collection: प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपट लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

Chetan Bodke

प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार कमाई सुरू आहे. लवकरच हा चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. बॉक्स ऑफिसवर १००० कोटींच्या क्लबकडे घोडदौड करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये लवकरच समावेश होणार आहे. ॲटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाच्यानंतर नागआश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा समावेश होणार आहे.

ॲटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने जगभरामध्ये बॉक्स ऑफिसवर ११०० कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज झालेला आहे. त्यानंतर प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचाही समावेश होणार आहे. देशभरामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरामध्ये या चित्रपटाने ९७०.८० कोटींची कमाई केलेली आहे. आता लवकरच हा चित्रपट १००० कोटींकडे वाटचाल करीत आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट २७ जून २०२४ ला रिलीज झालेला आहे. या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट रिलीज झालेले आहेत. पण त्या सर्व चित्रपटांसमोर ‘कल्की २८९८ एडी’ने अफलातून कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

‘कल्की २८९८ एडी’ लवकरच 'जवान'चा रेकॉर्ड मोडेल. जवानने २२ दिवसात ५८१ कोटींची कमाई केली होती. तर कल्कीने २२ दिवसात ५९९ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे इथे कल्कीने जवानला मागे टाकलं आहे.

मात्र जवानची एकूण कमाई अजूनही कल्कीपेक्षा जास्त आहे. जवानने एकूण ६४० कोटींची कमाई केली होती. जर कल्कीची कमाई अशीच सुरू राहिली तर कल्की हा रेकॉर्ड काही दिवसातच तोडू शकतो.

'बाहुबली २' १ हजार ३० कोटीं, ८५९ कोटींसह 'केजीएफ', 'आरआरआर' ७८२ कोटींची कमाई, 'जवान' ६४० कोटी जर कल्कीने हा आणखी ५० कोटींची कमाई केली तर तो जवानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर जाईल. ६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रदर्शनाच्या आधीपासूनच जोरदार चर्चा सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT