Kailash Kher Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kailash Kher Birthday : वयाच्या १४ व्या वर्षी सोडलं घर, मग बनले जगप्रसिद्ध गायक, कैलाश खेर यांचा थक्क करणारा प्रवास

Kailash Kher Life Untold Story : आज (७ जुलै) प्रसिद्ध बॉलिवूड गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे. आज आपण त्यांच्या वाढदिवशी कैलाश खेर यांच्या फिल्मी करियरबद्दल जाणून घेऊया...

Chetan Bodke

कैलाश खेर यांनी स्वत:ची ओळख आपल्या आवाजातून निर्माण केली आहे. आजच्या घडीला केलाश यांना विशेष ओळखीची गरज नाही. आज (७ जुलै) प्रसिद्ध बॉलिवूड गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे. आज आपण त्यांच्या वाढदिवशी कैलाश खेर यांच्या फिल्मी करियरबद्दल जाणून घेऊया...

आपल्या आवाजाने जादूई आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पद्मश्री कैलाश खेर यांचा जन्म ७ जुलै १९७३ रोजी झाला. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असून त्यांचं बऱ्यापैकी आयुष्य तिकडेच गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताचा वारसा मिळाला होता.

कैलाश खेर यांचे वडील लोकसंगीतकार आणि पुजारी होते. ते अनेकदा स्थानिक कार्यक्रमांमध्ये पारंपारिक लोकगीते गायचे. कैलाश यांनी केव्हाच संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नव्हता. वयाच्या चौथ्या वर्षापासून वडिलांनी लिहिलेले गाणे त्यांनी स्वत: गायला सुरूवात केली. तेव्हापासून त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत.

कैलाश खेर यांनी वयाच्या १२ व्या वर्षी रागाच्या भरात घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उदरनिर्वाहासाठी दिल्ली विमानतळावर व्यवसाय सुरू केला. पण कैलाश यांना व्यवसायात यश मिळाले नाही. २१ व्या वर्षी त्यांनी दिल्लीत हस्तकलेतून तयार झालेल्या वस्तू जर्मनीला निर्यात करायचे. पण काही दिवसानंतर त्यांचा व्यवसाय अचानक ठप्प झाला. व्यवसायात सतत अपयश मिळाल्यामुळे ते पूर्णपणे खचून गेले होते. यानंतर ते पंडित होण्यासाठी ऋषिकेशला गेले. तिथे ते पुजारी झाले.

एका मुलाखतीत कैलाश यांनी सांगितले की, ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले होते. परंतु तिथल्या सहकाऱ्यांशी त्यांचे मत जुळत नव्हते. प्रत्येक गोष्टीत अपयश मिळत असल्यामुळे एक दिवशी त्यांनी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी गंगा घाटावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याला वाचवले. कैलाश खेर यांनी एकदा मुलाखतीत सांगितले की, ते त्यांच्या वाढदिवशी कधीही केक कापत नाहीत. वाढदिवसाला कैलास केक कापण्याऐवजी यज्ञ, हवन आणि विधी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT