Junior NTR Saam Tv
मनोरंजन बातम्या

South Superstar: साउथचा हा सुपरस्टार फॅन्ससाठी कसा बनला देवमाणूस?, वाचा इनसाइड स्टोरी!

Junior NTR: ज्युनिअर एनटीआर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेता खऱ्या आयुष्यातही सुपरस्टार आहे. त्याने गेल्या ११ वर्षांपासून एका चाहत्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे.

Siddhi Hande

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांनी फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरातील चाहत्यांना वेड लावले आहे. साउथच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहेत. त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. ज्युनिअर एनटीआर ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. तो ऑन स्क्रिनसोबकच खऱ्या आयुष्यातही सुपरस्टार आहे. तो गेल्या ११ वर्षांपासून त्याच्या एका चाहत्याच्या कुटुंबाची काळजी घेत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांच्या नावाने वेगवेगळी मंदिरे बांधण्यात आली आहे. चाहत्यांच्यासाठी कलाकार हे कोणत्याही देवापेक्षा कमी नाही असे सांगण्यात येते.याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ज्युनिअर एनटीआर.

एका चाहत्याच्या कुटुंबाची घेतोय काळजी

ज्युनिअर एनटीआरच्या एका चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्याला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी ज्युनिअर एनटीआरच्या एका चाहत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेत्याने चाहत्याच्या कुटुंबियांना ५ हजार रुपयांची मदत केली.त्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली. या घटनेला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्युनिअर एनटीआर आजही त्याच्या चाहत्याच्या कुटुबांची काळजी घेत आहेत.

म्युझिक लाँचसाठी ९ अतिरिक्त रेल्वे चालवल्या (Juion NTR Music Launch Event)

ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे अजून एका घटनेतून दिसून आलं होतं. २००४ साली एका म्युझिक लाँच सोहळ्याला १० लाख चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी चाहत्यांसाठी तब्बल ९ अतिरिक्त रेल्वे चालवण्यात आल्या होत्या.

लग्नात १२०० चाहत्यांना निमंत्रण (Junior NTR Invite 12000 fans At His Wedding)

ज्युनिअर एनटीआरने त्याच्या लग्नात तब्बल १२००० चाहत्यांना आमंत्रण दिले होते. आजकाल सेलिब्रिटी फक्त आपल्या कुटुंबातील आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थित लग्न करतात. परंतु ज्युनिअर एनटीआरने त्याच्या लग्नासाठी चाहत्यांना आमंत्रण दिले होते. त्याने १५००० लोकांच्या उपस्थित लग्न केले. त्यातील १२००० त्याचे चाहते होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT