कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐन गणेशोत्सव सुरू होण्याआधी मुंबई ते गोवा नवीन ट्रेन धावणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल गुरुवारी दुपारी वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यानच्या द्वि-साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही रेल्वे गोव्यातील मडगाव येथून दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल आणि रात्री 11.40 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. तसेच ती वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 6.50 वाजता सुटेल आणि रात्री 10 वाजता मडगावला पोहोचेल.
ही रेल्वे बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
20 डब्यांच्या या रेल्वेमध्ये डब्यांच्या वेगवेगळ्या श्रेणी असतील: एसी 2-टायर, एसी 3-टायर, एसी 3-टायर इकॉनॉमी क्लास, स्लीपर क्लास आणि सामान्य सेकंड क्लास.
दरम्यान, राज्यातील128 रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरवासीयांना कोकणात जाणे सुलभ व्हावे यासाठी मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे, असं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.