Ruchika Jadhav
हिमालय क्विन या ट्रेनने कलका ते शिमलापर्यंतचा प्रवस करता येतो. यातून प्रवास करताना तुम्हाला अद्भुत जंगल आणि डोंगर दऱ्यांचा परिसर लागतो.
जलपाईगुढी ते दार्जिलिंगचा प्रवास करताना तुम्हाला दार्जिलिंग हिमालयन ट्रेनचा पर्याय आहे. या ट्रेनने प्रवास करताना निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहायला मिळतं.
वास्को द गामा टू लोंडा या रेल्वे प्रवासात आजूबाजूस फेसळणारे धबधबे पाहायला मिळतात.
मुंबईहून गोव्याला जाताना प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय निवडा. कारण या रूटवर सुद्धा भन्नाट असे धबधबे आणि सह्याद्रिच्या पर्वतरांगा पहायला मिळतात.
कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम हा अगदीत छोटा ट्रेन प्रवास आहे. मात्र येथून प्रवास करताना तुमची ट्रेन नारळांच्या उंच उंच झाडांमधून जाते.
माथेरान हिल स्टेशन फिरण्यासाठी सुद्धा रेल्वेचा पर्याय निवडला तर येथे प्रवासात तुम्हाला माथेरानचं खरं निसर्ग सौंदर्य पाहता येईल.