भिवंडीत एक धक्क्दायाक घटना घडलीय. टायरमधेय हवा भरत असताना टायर बॉम्बसारखा फुटलाय. भिवंडी तालुक्यातील मानकोली परीसरात इंडियन ऑईल पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या टायरच्या दुकानांमध्ये हवा भरत असताना टायरमध्ये अति जास्त प्रमाणात हवा भरल्याने टायर अचानक फुटून हवेत उडाल्याची घटना घडली.
सुरेंद्र कुमार यादव वर्षे याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आपण खबरदारी घेतली पाहिजे, हेच लक्षात येईल.
या घटनेच्या व्हिडिओत दिसत आहे की, सुरेंद्र हा टायरमध्ये हवा भरत आहे. तर आणखी एक तरुण त्याच्या शेजारी उभा आहे. सुरेंद्र टायरमध्ये हवा भरत असताना अचानक तयार ब्लास्ट होतो. टायर ब्लास्ट झाल्याने हवा भरत असलेला सुरेंद्र जागीच कोसळल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. टायर ब्लास्टमध्ये गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्रच्या मदतीला त्याच्या शेजारी उभा असलेला तरुण धावताना दिसत आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सामान्यत: टायर स्फोटाच्या घटना उन्हाळ्यातच जास्त होतात. याची दोन-तीन प्रमुख कारणे आहेत. उदाहरणार्थ, टायर जास्त फुगवल्याने टायरच्या आत दबाव निर्माण होतो आणि उन्हाळ्यात जेव्हा वाहन रस्त्यावर सतत धावते तेव्हा हा दाब आणखी वाढतो. यामुळे अनेक वेळा टायर फुटतो.
तज्ज्ञांनी सांगितले, ''एक प्रमुख कारण म्हणजे टायर खराब होणं. सतत गाडी चालवल्यामुळे टायर खराब होतो. ते वेळीच बदलले नाही तर ते अपघाताचे कारणही ठरू शकते. तिसरे प्रमुख कारण टायरमधील हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. जर सामान्य हवा भरली असेल तर अपघाताची शक्यता जास्त असते.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.