Kangana Ranaut Movie: कंगना राणौत प्रचंड संतापल्या, थेट कोर्टात जाण्याची भाषा; नेमकं घडलं तरी काय?

Kangana Ranaut Emergency Movie: कंगना राणौत अभिनयाच्या जगात तिच्या टॅलेंटसोबतच तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. तिचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेकदा वादात सापडतात. आता तिचा आगामी 'इमर्जन्सी' हा चित्रपटही अडचणीत आला आहे.
Entertainment News
Kangana Ranaut MovieSaam Tv
Published On

कंगना राणौत अभिनयाच्या जगात तिच्या टॅलेंटसोबतच तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. तिचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेकदा वादात सापडतात. आता तिचा आगामी 'इमर्जन्सी' हा चित्रपटही अडचणीत आला आहे. अभिनेत्रीने दावा केला आहे की तिच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली नाही.

Entertainment News
Bigg Boss Marathi 5: 'यापुढे मला तुझा पार्टनर नाही बनायचं...', अभिजीतच्या निर्णयाने निक्की पडणार एकटी

कंगना रणौतचे चित्रपट अनेकदा रिलीजपूर्वीच वादात सापडतात. आता तिचा आगामी ‘इमर्जन्सी’हा चित्रपट वादात सापडला आहे. अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कंगना राणौतने आरोप केला आहे की, तिचा 'इमर्जन्सी' चित्रपट अजूनही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)कडून प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहे. शुक्रवारी, अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले, 'की ती तिच्या चित्रपटासाठी लढणार आहे आणि ती न्यायालयात जाण्यास देखील तयार आहे.'

हा चित्रपट भारतातील आणीबाणीचा वादग्रस्त काळ, राजकीय अशांतता आणि व्यापक नागरी हक्कांच्या उल्लंघना संदर्भातली परिस्थितीवर आधारित आहे. मात्र या चित्रपटात दाखवलेल्या इंदिरा गांधींची हत्या आणि अशांत पंजाब दंगली यासारख्या गंभीर ऐतिहासिक घटना यामुळे CBFCची मान्यता मिळाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान यावर कंगनाने आपली निराशा व्यक्त केली आहे. कंगनाचे म्हणणे आहे की प्राथमिक मंजुरी असूनही, विविध गटांच्या धमक्या आणि दबावामुळे प्रमाणपत्र थांबवण्यात आले आहे.

Entertainment News
Deepika- Ranveer: दीपिका-रणबीरचा मोठा निर्णय, बाळासोबत ११९ कोटींच्या नव्या घरात करणार प्रवेश

या वादग्रस्त चित्रपटाला पडद्यावर आणण्याच्या कंगनाच्या धाडसी प्रयत्नांना काहींनी पाठिंबा दिला आहे. चित्रपटाबद्दल लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विशेषतः राजकीय संबंध असलेल्यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे असे कंगना सांगते. या चित्रपटावर धार्मिक गटांसह विविध स्तरातून टीका देखील झाली आहे.

या आगीत तेल टाकत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) चित्रपटावर बंदी घालावी किंवा चित्रपट निर्मात्यांनी लेखी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ही मागणी ट्रेलरच्या रिलीजनंतर आली आहे. SGPCच्या मते, शीख आणि पंजाबींना खलिस्तानी दहशतवाद्यांशी जोडून नकारात्मक दाखवण्यात येत असल्याने त्यांनी हि मागणी केली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांवर अतिरिक्त दबाव निर्माण होऊन वादाची नवी लाट उसळली आहे.

कंगना रनौत ला लीगल नोटिस

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी ने चित्रपटाची प्रोड्यूसर अर्थातच कंगनाला एक लीगल नोटिस दिली आहे. एसजीपीसीने चित्रपटाचा ट्रेलर देखिल काढण्याची मागणी केली आहे. कंगना रनौतने शिखांच्या भावना दुखावल्या असल्याचं देखिल म्हंटले जात आहे. याशिवाय कंगनाचा शिरच्छेद करण्याची धमकी देखील सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. यामुळे या आधी 3 वेळा चित्रपटाचे प्रदर्शन देखील पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री म्हणाली की मला आशा आहे की माझा चित्रपट सेन्सॉरने पास केला असेल, ज्या दिवशी आम्हाला प्रमाणपत्र मिळणार होते, त्या दिवशी बऱ्याच लोकांनी खूप नाटक केले,” कंगना तिच्या दाव्यात म्हणाली तसेच अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे तो रिलीज होईल, अशी आशा आहे. कारण अचानक माझ्या पायावरून कोणीतरी गालिचा काढल्यासारखं मला झालं, मला विश्वास आहे की मला प्रमाणपत्र मिळेल आणि माझा चित्रपटही प्रदर्शित होईल. परंतु हे लक्षात घेणे देखील तितकेच गरजेचे आहे की अजूनही कंगना रणौतच्या अडचणी संपलेल्या नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com