Manasvi Choudhary
नथ हा मराठमोळ्या सौंदर्याचा महत्वाचा दागिना आहे. साडीवर खास महिला नथ परिधान करतात.
सध्या बाजारात नथीचे विविध डिझाईन्स आहेत. कोल्हापुरी स्टाईल नथीचे प्रकार महिलांना आकर्षित करतात.
कोल्हापुरी नथ परिधान केल्यास महिला उठून दिसतात. पूर्वी राजेशाही घराण्यातील स्त्रिया कोल्हापुरी नथ घालायच्या.
अस्सल महाराष्ट्रीयन ओळख असलेली नथ म्हणजे कोल्हापुरी नथ, यामध्ये एक मोठा लाल खडा असते आणि बाजूने मोती असतात.
लग्नानिमित्त नवरीसाठी मोत्याच्या ज्वेलरीवर मॅचिंग तुम्ही मोत्याची नथ निवडू शकता यामुळे नवरीचा लूक उठून दिसतो.
टेम्पल ज्वेलरी स्टाईलनथीवर देवी-देवतांची किंवा प्राचीन मंदिराची नक्षी असते. ही नथ दिसायला अत्यंत प्राचीन आणि कलात्मक वाटते.
मोराची नक्षी असलेली नथ कायमच ट्रेंडिग असते खास पैठणी साडीवर ही नथ आणखी उठून दिसते.